खटाव : खटाव (ता. खटाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. येथील देशमुख गल्लीतील बंदिस्त गटार व काँक्रीट रस्ता तसेच बोबडे गल्लीतील सभामंडप या कामांचे भूमिपूजन आ. महेश शिंदे, राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, माजी सरपंच रामचंद्र देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपटराव देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
बोबडे गल्लीतील सभामंडप व देशमुख गल्लीतील बंदिस्त गटारसाठी खटाव ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून निधी दिला जाणार आहे, तर देशमुख गल्लीतील काँक्रीट रस्त्यासाठी आ. महेश शिंदे यांच्या आमदार फंडातून निधी दिला जाणार आहे. यावेळी विलासराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, सुनील देशमुख, अरुण देशमुख, दिवाकर देशमुख, बाबासाहेब देशमुख, दत्तात्रय धुमाळ, अमर देशमुख, चरण बोबडे, राहुल जमदाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.