बनवडी (ता. कराड) येथील पार्लेनगर परिसर येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सुशोभीकरण कामाचे सरपंच प्रदीप पाटील यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, उपसरपंच विकास करांडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, नरहरी जानराव, अख्तार आत्तार, विद्या शिवदास, पल्लवी साळुंखे, स्वाती गोतपागर, अश्विनी विभुते, विलासराव खापे, अशोक मोहने, संपतराव माळी, विजय चव्हाण, दादासाहेब माळी आदी उपस्थित होते.
बनवडी गाव हे कराड शहरानजीक असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या फंडातून पाच लाख रूपये सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पार्लेकर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी अनेक वृद्ध लोक विश्रांतीसाठी येत असतात. या ठिकाणी पेवर ब्लाॅक बसवण्यात येणार आहेत.
फोटो..
बनवडी येथे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे आदींसह सदस्य.