शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भोसले जोमात; चव्हाणांवर चिंतनाची वेळ : कºहाड तालुका ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:56 IST

प्रमोद सुकरे ।कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल पाहता हा निकाल भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थकांचा उत्साह वाढविणारा आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांना आलेले यश पाहिले तर ते समाधानकारक असल्याचे दिसते. मात्र, विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देउंडाळकरांच्या बालेकिल्ल्यातही भोसले गटाची ‘एंट्री’

प्रमोद सुकरे ।कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल पाहता हा निकाल भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थकांचा उत्साह वाढविणारा आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांना आलेले यश पाहिले तर ते समाधानकारक असल्याचे दिसते. मात्र, विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला हे निकाल निश्चितच आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. यातून कोण आणि काय बोध घेणार, हे येणारा काळच ठरवेल.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया कºहाड दक्षिण मतदार संघातील राजकीय वातावरण सध्यातरी चांगलेच अस्थिर बनले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या दोघांच्यातील काँग्रेसअंतर्गत वाद हे त्यामागचे मुख्य कारण मानले जाते आणि ‘दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ’ या म्हणीचा प्रत्यय येतोय की काय, अशी मतदारसंघाची परिस्थिती आहे.

कºहाड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यामध्ये रेठरे बुद्रुक, येणपे, शेळकेवाडी व येवती या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात लोकसंख्येने मोठी असणाºया रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. कारण भाजपचे प्रदेश चिटणीस व पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गावची ही निवडणूक होती आणि होमपीचवर भोसलेंची काय अवस्था होतेय, याची साºयांनाच उत्सुकता होती.

डॉ. अतुल भोसलेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला खरा; पण होमपीचवर त्यांचे पानिपत झाले. कारण त्यांना अठरापैकी एकही जागा जिंकता आली नाही आणि गावात अपेक्षित मतेही घेता आली नाहीत. भोसले गटाला सरासरी ७५ टक्के मते या निवडणुकीत पडलेली दिसतात. याशिवाय उंडाळे खोºयातील येवती ग्रामपंचायतीवरही भोसले गटाने सरपंचपदाचा झेंडा फडकवलाय,ही बाब त्यांच्यादृष्टीने जमेचीच मानावी लागेल.उंडाळे खोºयातील येणपे व शेवाळेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटांतर्गत झाली. येथे त्यांनीबाजी मारली असली तरी यादोन्ही गावांत भाजपने खाते खोलल्याचीच जास्त चर्चा आहे, हेदेखील महत्त्वाचे. येवतीत भोसले गटाने फडकवलेला सरपंचपदाचा झेंडा आणि येणपे व शेवाळेवाडी गावात उघडलेले खाते भविष्यात उंडाळकरांची डोकेदुखी वाढविणार,हे मात्र नक्की.पृथ्वीबाबा समर्थक चिंतन करणार का?ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंनी जवळजवळ प्रत्येक गावात पॅनेल उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही मिळाले. बंडखोर उंडाळकरांनी भागातील तिन्ही गावांत पॅनेल उभे करीत दोन ठिकाणी यश मिळवले. राष्ट्रवादीच्या अविनाश मोहितेंनी रेठरेत कठीण परिस्थिती असतानाही पॅनेल उभे केले. मात्र, या सगळ्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचे पॅनेल कोणत्याच ठिकाणी दिसले नाही, हे विशेष. ही बाब चव्हाण गटाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे; पण ते आत्मचिंतन करणार का? हा वेगळा विषय.राजाभाऊंचा ‘भाव’ दिसलाच नाहीज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. आनंदराव पाटील ऊर्फ राजाभाऊ यांनी काही वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यांना जिल्हा परिषद निवडणूकही त्यांनी त्या चिन्हावर लढवली. मात्र, स्वत:च्या मतदारसंघात एकाही गावात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे राहिल्याचे दिसले नाही. त्यामुळे राजाभाऊंचा ‘भाव’ उंडाळे खोºयात दिसलाच नाही, अशी चर्चा आहे.