शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीता भोसले यांना जाहीर

By दीपक शिंदे | Updated: November 2, 2022 12:27 IST

पुरस्काराच्या मानकरी  सुनीताताई भोसले  मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेले वीस वर्षा पासून करीत आहेत.

सातारा  : येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या चोवीसाव्या पुरस्कारासाठी पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या,'विंचवाचं तेल' या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका सुनीता भोसले (आंबळे-शिरुर , पुणे )  यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष  दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.     संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य,कला, संस्कृती , महिला विकास व परिवर्तनाची चळवळआदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह,शाल, गुच्छ असे आहे. यावर्षीचा २४ वा  मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीताताई  भोसले यांना ज्येष्ठ विचारवंत,लेखक, शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी  नगर वाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराच्या मानकरी  सुनीताताई भोसले  मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेले वीस वर्षा पासून करीत आहेत. त्यांनी क्रांती संस्था व आदिवासी फासेपारधी समाज संघटना, महाराष्ट्र च्या माध्यमातून  शैक्षणिक विकासाचे रचनात्मक काम हाती घेतले आहे. त्यांनी भटक्या समाजातील अनिष्ट चालीरीती,प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रबोधन तसेच अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष करीत न्याय व हक्क मिळवण्यासाठी लढाई चालवली आहे.त्यांनी पुणे जिल्ह्यातील जातपंचायत  थांबवण्यात पुढाकार घेऊन  मोठे योगदान दिले आहे. 

महाराष्ट्र फौंडेशनच्यावतीने कार्यकर्ता पुरस्कार देऊन  त्यांना अलिकडेच सन्मानित करण्यात आले आहे. भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने आतापर्यंत डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर),प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रझिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई), प्रा.डॉ. प्रज्ञा दया पवार (मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई), प्रा.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई), हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल),प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), डॉ.गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई),संध्या नरे-पवार (मुंबई), मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे), प्रा. आशालता कांबळे (डोंबिवली), निशा शिवूरकर (संगमनेर) व शिल्पा कांबळे (मुंबई), चेतना सिन्हा (म्हसवड-माण) आदी मान्यवर महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर