शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

‘भाऊ’ अन् ‘राजे’ सर्वाधिक श्रीमंत !

By admin | Updated: September 30, 2014 00:06 IST

वाढता वाढे संपत्ती : प्रतिज्ञापत्रातील आकडेवारी सांगते श्रीमंतीची कथा

सातारा : कायमस्वरूपी दुष्काळी माण-खटावमध्ये श्रीमंतीचा मात्र सुकाळ आहे. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केलेले संपत्तीचे विवरण लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शेखर गोरे सर्वाधिक श्रीमंत असून, त्यांची संपत्ती २९.८७ कोटी इतकी आहे. त्यांच्या जवळपास श्रीमंतीमध्ये त्यांच्या जवळपास पोहोचणारे फक्त सातारा-जावळीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. त्यांची संपत्ती २५.२२ कोटी इतकी आहे.प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाची आकडेवारीही त्यामध्ये दिली आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत झालेली वाढही लक्षणीय आहे. माण-खटावचे शेखर गोरे यांची संपत्ती सर्वाधिक असून, ती २९ कोटी ८७ लाख ५७ हजार १७३ रुपये आहे. यामध्ये २७ कोटी ६१ लाख ७५ हजार ७४८ स्थावर तर २ कोटी २६ लाख ११ हजार ४२५ रुपये जंगम मालमत्ता आहे.गतवर्षीच्या तुलनेत आमदार जयकुमार गोरे यांची संपत्ती दुप्पट आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती १ कोटी ५३ लाख ७९ हजार ८५३ इतकी असल्याचे म्हटले होते. यावेळी मात्र, संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यांची स्थावर मालमत्ता १ कोटी ४० लाख १० हजार ९७० तर जंगम मालमत्ता २ कोटी १ लाख ९ हजार ७९५ अशी एकूण ३ कोटी ४१ लाख २० हजार ७६५ इतकी आहे. शिवसेनेकडून नशीब आजमावणारे रणजितसिंह देशमुख यांची संपत्ती २.९३ कोटी तर अपक्ष उमेदवार अनिल देसाई १.७७ कोटी तर इतकी संपत्ती आहे.२००९ च्या निवडणुकीत सातारा-जावळीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची संपत्ती १७.५० कोटी इतकी होती. २०१४ मध्ये मात्र त्यामध्ये जवळपास अकरा कोटींनी वाढ झाली आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती २८.५९ कोटी इतकी असल्याचे नमूद केले आहे. माजी आमदारांच्या संपत्तीत घट- दगडू सकपाळ, सदाशिवराव पोळ आणि मदन भोसले या तीनही माजी आमदारांच्या संपत्तीत मात्र गतवेळच्या तुलनेत थोडीफार घट झाली आहे. सकपाळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संपत्ती पाच कोटी ६५ लाख ३४ हजार ८६९ इतकी होती. यंदाच्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेता ही रक्कम दोन कोटी १३ लाख ९४ हजार १९७ इतकी आहे.- २००९ मध्ये माजी आमदार सदाशिवराव पोळ यांची संपत्ती एक कोटी २२ लाख ७ हजार ४३२ रुपये इतकी होती. यावेळी मात्र त्यामध्ये ११ लाखांने घट झाली असून, एक कोटी १० लाख ५,८२३ रुपये इतकी आहे.- वाईचे माजी आमदार मदन भोसले यांची २००९ मध्ये असणारी संपत्ती एक कोटी ७४ लाख १५ हजार ५४९ इतकी होती. यावेळी मात्र, त्यामध्ये जवळपास ६५ लाखांनी घट झाली असून, एकूण संपत्ती एक कोटी ७ लाख ८१ हजार ७५६ इतकी आहे. (प्रतिनिधी)