शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

मराठी पदावर साकारले भरतनाट्यम्

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

नटराज महोत्सव : एकाच वेळी सादर झाली शिल्प, चित्र आणि नृत्यकला

सातारा : नृत्यसंवाद मुंबई, अल्टिट्यूड पुणे, स्रेहललीत कला केंद्र व नादबह्म केंद्र पुणे, या चार नृत्य संस्थेंच्या गुरू स्मीता महाजन साठे यांच्या १३ शिष्यांच्या मराठी रचनांवरील बहारदार भरतनाट्यम् नृत्यांनी नटराज संगीत-नृत्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसी उपस्थितांची मने जिंकून घेतली. आपल्या निपूण पद्लालित्य आणि सर्वांग सुंदर भावमुद्रांचा सुरेख नजारा नृत्यांतून यावेळी पाहण्यास मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी विद्येची देवता गजाननाच्या ‘गाईये गणपती जगवंदन’ या संत तुलसीदासांनी रचलेल्या ‘मोहनम्’ रागातील आदितालात बद्ध असलेल्या रचनेवर सादर केली. त्यानंतर ‘हंसध्वनी’ रागातील आदितालातील पुष्पांजली सादर करत ‘माया माळगौडा’ रागातील ‘आडी कोंडर’ ही तमीळ पदावर रचना व त्यातील नृत्य सादर झाले. नृत्य देवता नटराजाचे नृत्य व त्याचे वर्णन असणारे ‘चिदंबरनाथ’ हे पद आपल्या नृत्यातून निवेदिता बडवे या कलाकाराने सफाईदारपणे सादर केले. मराठीतील ‘अजि सोनियाचा दिवस’ या पदावर मिताली व सुमेधा राणे या दोघींनी नृत्य सादर करताना त्यातील अभिनय व भावमुद्रा अतिशय सहजपणे दाखवत हा अविष्कार केला. नृत्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार नृत्य मार्गदर्शिका व कलाविष्कार भरतनाट्यम् नृत्य संस्थेच्या गुरू अस्मिता भालेराव यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तिपत्रे देऊन करण्यात आला. यावेळी उषा शानभाग, आंचल घोरपडे, रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, व्यस्थापक चंद्रन, नारायण राव, मुकुंद मोघे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)