शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात ‘जनशक्ती’कडून भोसलेंचे स्वागत... राजकीय वर्तुळात ठरला चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:16 IST

प्रमोद सुकरे ।कºहाड : ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या अतुल भोसलेंची कºहाडात दमदार ‘एन्ट्री’ झाली. मतदारसंघात प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कºहाडात तर अख्खी ‘जनशक्ती’ भोसलेंच्या स्वागताला हजर होती. या नगरसेवकांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलच !येथील कृष्णा उद्योग समूहाच्या डॉ. अतुल भोसले यांना ...

ठळक मुद्दे घडतंय बिघडतंय-नगरसेवकांची उपस्थिती विचार करायला लावणारी

प्रमोद सुकरे ।कºहाड : ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या अतुल भोसलेंची कºहाडात दमदार ‘एन्ट्री’ झाली. मतदारसंघात प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कºहाडात तर अख्खी ‘जनशक्ती’ भोसलेंच्या स्वागताला हजर होती. या नगरसेवकांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली नाही तर नवलच !

येथील कृष्णा उद्योग समूहाच्या डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावर मुंबईत शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भोसले कºहाडात आले. त्यांच्या स्वागताची भाजप कार्यकर्त्यांनी तयारी तर केली होतीच. कºहाड शहरात भोसलेंचे आगमन होताच शहरातील भाजप नगरसेवकांसह जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांचे कोल्हापूर नाक्यावरच पुष्पहार घालत स्वागत अन् कौतुक केले.

पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालील जनशक्तीचे नगरसेवक अतुलबाबांच्या स्वागताला हजर झाल्याने त्याची कºहाड शहरासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या स्वागतासाठी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, महेश कांबळे, किरण पाटील यांच्यासह महिला नगरसेविकांच्या परिवारातील निशांत ढेकळे, सुरेश पाटील, ओंकार मुळे, राहुल खराडे, विनोद भोसले, प्रीतम यादव, शिवराज इंगवले आदींची उपस्थिती होती. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे हेही स्वागताच्या नियोजनात अग्रेसर होते.दोन बाबांची गळाभेटराज्यमंत्री डॉ. अतुल भोसले यांचे जनशक्तीच्या नगरसेवकांनी स्वागत केल्यानंतर राजेंद्रबाबा यादव अन् डॉ. अतुलबाबा यांनी एकमेकांना अलिंगन देत या निवडीचा आनंद व्यक्त केला. त्यावेळी उपस्थितांच्या नजरा या गळाभेटीवर खिळल्या होत्या...ही तर अनोखी भेटडॉ. सुरेश भोसले यांचा बुधवारी वाढदिवस होता; पण त्यांनी तो कधीही सार्वजनिकपणे साजरा केलेला नाही. त्यामुळे हार, तुरे, भेटवस्तू स्वीकारणे तर दूरच; पण पुत्र डॉ. अतुल भोसले यांना मिळालेले राज्यमंत्री पद ही त्यांच्या वाढदिनी मिळालेली अनोखी भेट असल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण