खंडाळा : ‘विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाडळी गावाने विकासाला प्राधान्य देत विविध कामे साकारली आहेत. कार्यकर्त्यांची एकीची भावना गावाला पुढे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे पाडळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असे आश्वासन खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांनी दिले.
पाडळी (ता. खंडाळा) येथील महादेव मंदिर येथे घाट बांधकाम, खंडोबा मंदिरे ते ग्रामपंचायत बंदिस्त गटार काम तसेच नवीन अंगणवाडी बांधकाम या तिन्ही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, तात्यासाहेब धायगुडे, विश्वास धायगुडे, सरपंच स्वाती ठोंबरे, उपसरपंच दीपक धायगुडे, ग्रामसेवक मल्हारी शेळके, रामचंद्र धायगुडे, विकास धायगुडे, पोपट धायगुडे, शिवाजी वाघमारे, संतोष जाधव, सागर गावडे, सचिन निकम, सचिन धायगुडे, किशोर दीक्षित, नागेश्वर ननावरे, भीमराव बोराटे, दादा धायगुडे, सतीश धायगुडे, नीलेश वाघमारे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सभापती राजेंद्र तांबे म्हणाले, ‘पंचायत समितीच्या प्रयत्नाने खेड बुद्रुक गणातील विविध गावे व परिसराचा विकास झाला आहे. या पुढील काळात देखील गावोगावची विकासकामे करण्यात कदापि कमी पडणार नाही; मात्र जनतेनेदेखील विकासकामासाठी चांगल्या विचारांच्या पाठीशी उभे राहावे.’
.................................................
फोटो मेल केला आहे .