शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

पुण्याच्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

पांडवगड : एक पर्यटक सातशे फूट दरीत कोसळून गंभीर जखमी

वाई : पुण्याहून पांडवगड, ता. वाई येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पर्यटकांमध्ये उडालेल्या धावपळीत एक पर्यटक तब्बल सातशे फूट दरीत कोसळला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महाबळेश्वरच्या जवानांनी दरीतून वर काढून त्याला तत्काळ साताऱ्याकडे हलविले.महेश जोशी (वय ४८, रा. वाकडवाडी, पुणे) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. पुण्यातील एका कंपनीचे ४१ कर्मचारी शनिवारी सुटी असल्याने पांडवगडला फिरण्यासाठी आले होते. पांडवगड चढत असताना तेथे असणाऱ्या मधाच्या पोळ्याला पर्यटकांचा धक्का लागला. त्यामुळे मधमाश्या खवळल्या आणि पर्यटकांवर तुटून पडल्या. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये एकच धांदल उडाली आणि ते सैरावैरा धावू लागले. पांडवगड हा अतिदुर्गम आहे. याठिकाणी दळणवळसाठी रस्त्यांची सोय नाही. रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे आणि दरीचा अंदाज न आल्याने महेश जोशी हे दरीत कोसळले. याची माहिती इतर साथीदारांना समजल्यानंतर सर्वजण दरीजवळ आले. जोशी यांना त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र दरी खोल असल्यामुळे कोणालाही उतरता आले नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी काही तासांतच जोशी यांना दरीतून वर काढले. जोशी यांच्या मणका आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)