शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे सातारचे पोलीस प्रतापसिंहनगरातील गुंडांना भितात

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

शशिकांत शिंदे : जिल्हाधिकारी, अधीक्षकांना दिले होते कारवाईचे आदेश

कोरेगाव : ‘आजवरच्या समाजकारणामध्ये मी विकासाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. बेकायदा गोष्टींना मी कधीही थारा देत नाही. प्रतापसिंंहनगर आणि खेड परिसरात बोकाळलेली गुंडगिरी आणि बेकायदा कामे रोखण्यासाठी पोलिसांना आदेश दिले होते; मात्र कलम ३५४ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने ते घाबरतात,’ असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. कोरेगावातून विजयी झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पाचारण केल्याने ते मुंबईत गेले होते. रविवारी मतदारसंघात दाखल झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि निवडणुकीतील लढत आणि विजय याबाबत सविस्तर चर्चा केली. ‘मतदारसंघात सातारा तालुक्याने भरभरुन मते दिली; मात्र खेड विभागात अपेक्षित मताधिक्य कसे काही मिळाले नाही? त्या विभागात विरोधकांनी केलेला टोकाचा आणि टीकेचा प्रचार याविषयी तुमची भूमिका काय,’ या प्रश्नावर त्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाला लक्ष्य केले. ‘आताच्या निवडणुकीत ज्या प्रकारे प्रचार झाला, तो योग्य नव्हता. वास्तविक, मी दोनच वर्षांपूर्वी माझी भूमिका अत्यंत स्पष्टपणाने मांडली आहे. मी विकासाला सहकार्य करतो. बेकायदा गोष्टींना नाही. प्रतापसिंंहनगर परिसर माझ्या मतदारसंघात येतो. तेथे सामान्य जनता वास्तव्य करते. त्यांच्यासाठी मी निधी उपलब्ध करुन विकासकामे केली आहेत. मला जनतेशी नाते जोडायचे आहे. अन्य कोणाशीही नाही. आजवरच्या वाटचालीमध्ये मी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’ ‘सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने काम करत असताना प्रतापसिंंहनगर आणि खेड परिसरात अनेक चुकीचे प्रकार घडले. विकसकाला मारहाण आणि पैसे उकळण्याबाबत तक्रारी झाल्या, त्यावेळीच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेस ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे तेथे चुकीच्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. माझा काडीमात्र संबंध नसताना पोलीस जाणीवपूर्वक माझ्या नावाचा वापर करुन स्वत:ची बाजू सावरताना दिसतात. कलम ३५४ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने ते आपली भूमिका बजावण्यात कमी पडतात,’ असा आरोप आमदार शिंंदे यांनी केला. (प्रतिनिधी)एखाद्या सामान्य माणसावर लगेच कारवाई होते; मग या प्रकारात पोलिसांचे हात काय बांधले गेले आहेत काय? माझा या गोष्टींशी तसूभर संबंध नाही. निक्षून सांगतो की, याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईबाबत आदेश दिले होते. आजही त्यांची साक्ष आपण काढू शकतो. एकंदरीत पोलीस यंत्रणा दोषी असल्याने खेड विभागात गुंडगिरी वाढली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.- आमदार शशिकांत शिंदे