शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
5
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
6
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
7
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
8
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
9
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
10
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
11
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
12
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
13
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
14
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
15
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
16
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
17
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
19
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
20
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

उपाशीपोटी अंगणवाडीचे सुशोभीकरण

By admin | Updated: December 10, 2014 23:57 IST

तीन महिन्यांपासून मानधन थकित : स्वखर्चाने योजना राबविण्याची सक्ती

शिवथर : सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मानधन वेळेत न मिळाल्याने ससेहोलपट होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची कोणतीही सुचना नसताना अंगणवाडीच्या सेविकांना विविध योजना स्वखर्चातून राबविण्याची जिल्हा परिषदेचे कर्मचारी जबरदस्तीने करत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी यांची परिस्थिती ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे. अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देण्याकडे प्रशासन लक्षच देत नाही. गेली तीन महिने केलेल्या कामाचे मानधन अंणगवाडी सेविका-मदतनीस यांना मिळाले नाही. गेल्या वर्षी पगारवाढ झालेले हजार रुपयेही काहींना मिळाले नाही. जाहीर केलेला दिवाळी बोनस मिळालेला नाही. त्यामुळे ‘आम्ही आमचे कुटुंब कसे चालवायचे याबाबत आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असाही सवाल अंगणवाडीच्या सेविका करत आहेत. काही तालुक्यांमध्ये अंगणवाडी मानांकनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना नसतानाही अंगणवाडीच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून आणि गावाच्या सहकार्यातून अंगणवाडी सुशोभिकरण करण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. काही गावांमध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सहकार्य करत नसतात. परंतु या सेविकांना तक्रार करता येत नाही. याबाजूने पदाधिकारी आणि दुसऱ्या बाजूने पंचायत समितीचे अधिकारी कोणाबाबत तक्रार करायची? आमची नोकरी टिकवायची आहे. असेही काही महिला सेविकांनी सांगितले. तुटपुंज्या पगारामध्ये घर कसे चालवायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात. परंतु याबाबत होणारा खर्च अंगणवाडीच्या सेविकांना का? अंगणवाडी मानांकनासाठी बराच खर्च येतो. याबाबत ग्रामपंचायत सहकार्य का करत नाही. मगयेणारा खर्च यांच्या माथ्यावर का? होणारा खर्च शासनाच्या माध्यमातून वेळेत मिळाल्यास सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आयडॉल अंगणवाडी होतील, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. (वार्ताहर) सुशोभिकरण स्वखर्चातून काही तालुक्यांमध्ये अंगणवाडी मानांकनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना नसतानाही अंगणवाडीच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून आणि गावाच्या सहकार्यातून अंगणवाडी सुशोभिकरण करण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. बऱ्याच अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना स्वखर्चातून सांगली येथील मॉडेल अंगणवाडी भेट देण्यासाठी पाठवले जात आहे. येणारा खर्च एक वर्षानंतर किंवा शासनाकडून आल्यावर दिला जाईल, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आयएसओ मानांकनासाठी आम्ही कोणताही आदेश किंवा आमच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या नाहीत. अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना लेखी स्वरुपामध्ये पत्र दिले नाही. स्वत:च्या खर्चातून अंगणवाडीचे सुशोभिकरण करण्यास सांगितले नाही. रवि शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा