शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांची जाण असणाऱ्यांच्या पाठीशी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:07 IST

दहिवडी/फलटण : ‘आमचा कुलभूषण जाधव तीन वर्षे पाकिस्तानमधील जेलमध्ये आहे. तेव्हा तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली,’ अशी टीका ...

दहिवडी/फलटण : ‘आमचा कुलभूषण जाधव तीन वर्षे पाकिस्तानमधील जेलमध्ये आहे. तेव्हा तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली,’ अशी टीका करतानाच ‘या निवडणुकीत शेतकºयांची जाण असणाºयांच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.दहिवडी, (ता. माण) येथे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संजय शिंदे, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार तुकाराम तुपे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, आनंदराव देवकाते, एम. के. भोसले, विवेक देशमुख डॉ. संदीप पोळ, सुरेंद्र गुदगे आदी उपस्थित होते.पवार पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी अकलूजला आले होते. आम्हाला वाटले शेतकºयांना काहीतरी मदत करतील; परंतु शेतीप्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत. आज शेतीची अवस्था बिकट झालीय. बी-बीयाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. खताचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाला किंमत नाही. या प्रश्नांवर बोलायचे सोडून पंतप्रधान ‘शरद पवार ऊन लोगों के साथ क्यों है?’ असे मला म्हणतात. शेतकºयांच्या प्रश्नासाठी, दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकºयांची जाण असणाºयांच्याच पाठीशी मतदारांनी राहावे.’रामराजे म्हणाले, ‘माढ्यातील भाजपचे उमेदवार सांगतात मी रामराजे यांचा पुतण्या आहे. कोणी काही बोलले तर त्यावर विश्वास ठेवू नका. या निवडणुकीत चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी राहा.मुख्यमंत्र्यांनी नागपूरचाच विकास साधला : चव्हाण‘आज देशात सुप्त लाट आहे; पण जिल्ह्यात गालबोट लागेल, असे कोणीही वागू नये. माझ्या नावाचा कोणी गैरवापर केला तर ते खपवून घेणार नाही. भाजप सरकारने पाच वर्षांत नेमके काय केले, ते सांगावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त नागपूरचा विकास केला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर निवडणुका होणार नाहीत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक