शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त बॅँकेचं.. गेम पालिका राजकारणाची !

By admin | Updated: May 31, 2016 00:31 IST

सातारचे राजकारण : पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आरोपांची जुगलबंदी!--सांगा, जनता बँक कोणाची..?

सातारा : सातारा नगरपालिकेची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होत आहे. सातारची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जनता बँकेची निवडणूक ही नगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पालिका राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारी मंडळीच बँकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आरोपांची जुगलबंदी रंगली आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. साहजिकच या घासून-पुसून गुळगुळीत झालेल्या वाक्याचा प्रत्यय जनता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येतो आहे. जनता बँकेच्या निवडणुकीत विनोद कुलकर्णी, अ‍ॅड. मुकुंद सारडा यांचे सत्ताधारी भागधारक पॅनेल विरुद्ध प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले यांचे परिवर्तन पॅनेल उभे ठाकले आहे. दोन्ही पॅनेलमध्ये कधी-काळी टोकाचे विरोधक असणाऱ्या मंडळींनी गळ्यात गळे घातल्याचे चित्र आहे. सातारा शहराच्या सत्तेवर प्राबल्य असणाऱ्या सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीचे अनेक हुकमी एक्क्यांनी तह केल्याने सध्या जनता बँक निवडणुकीत दही-काल्याची सरमिसळ झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आता ही परिस्थिती एका बाजूला असताना नगरपालिकेला जे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असतात, तेच बँकेलाही एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. विद्यमान अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर परिवर्तन पॅनेलच्या प्रकाश बडेकर, राजन जोशी, प्रकाश गवळी यांनी निशाणा साधत मागच्या दाराने आत आले अन् अधिकाऱ्यांना हाताशी धरून अध्यक्ष झाले, असा आरोप करत आहेत. कुलकर्णी हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्याचा आव आणत असल्याचाही या मंडळींचा आरोप आहे. तर परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रकाश बडेकर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भागधारक पॅनेलचे उमेदवार नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच तोंडसुख घेतले. प्रकाश बडेकर यांनी आधी ज्ञानसोना पतसंस्थेत ‘प्रकाश’ पाडावा, असा सल्ला त्यांनी दिला. याही पुढे जाऊन जिल्हा बँकेतील काजू खिशात आणणारे व नातेवाइकांना खिमा पाव पार्सल आणले जातात, असा जाहीर आरोपही विजय बडेकर यांनी प्रकाश बडेकर यांच्यावर केला. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांव्यतिरिक्त नगरपालिकेवर डोळा लावून बसलेल्या मंडळींकडूनही आरोपांचे शालजोडे मारले जात आहेत. एकंदरीत जनता बँकेच्या निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुन्हा एकदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळतील. त्यामुळे जनता बँकेची ही निवडणूक पालिका निवडणुकीची रंगीत तालीम ठरत आहे. (प्रतिनिधी)नगरपालिकेचे आभासी चित्र!गेल्या पाच वर्षांत मनोमिलनाच्या सत्तेत अनेकांचा कोंडमारा झाला. काहीजण सत्तेत असूनही विरोधक असल्यासारखे वागत राहिले. तर मनोमिलनाच्या सत्तेला उलथून टाकण्याची मनीषा बाळगणाऱ्यांचे बळही बँक निवडणुकीच्या निमित्ताने वाढले आहे. मनोमिलनाच्याच काही शिलेदारांनी अशा मंडळींचा हात धरला असल्याने बँक निवडणुकीनंतर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होईल, याचे आभासी चित्र आत्ताच पाहायला मिळते आहे.