शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांमध्ये ‘सावधान’चे फलक !

By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST

जनजागृती : ए.टी.एम. पासवर्डबाबत आवाहन : फसगत झालेल्यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण जास्त

रमेश पाटील - कसबा बावडाबॅँक ग्राहकांनो सावधान...! कोणतीही बॅँक आपल्या ग्राहकाला ए.टी.एम कार्डनंतर पासवर्ड आणि खाते नंबर कधीही फोन करून अथवा मॅसेजद्वारे विचारत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये, अशा सूचनांचे फलक आता अनेक बॅँकांमध्ये झळकू लागले आहेत. तसेच बॅँक कर्मचारीही ग्राहकाला आपला ‘पासवर्ड’ कोणाला सांगू नका अशा सूचना करू लागले आहेत. तरीही पासवर्ड विचारून ए. टी. एम.मधून पैसे हडप करण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत.ए.टी.एम. कार्ड नंबर व पासवर्ड विचारून परस्पर पैसे काढण्याच्या प्रकारांत गेल्या दोन वर्षांत खूपच वाढ झाली आहे. फोन करून गोड आवाजात आपण बॅँकेतून बोलतोय, असे सांगून काही जणांकडून गंडा घालण्याचा उद्योग सुरू आहे. खात्यावरील पैसे गायब झाल्यावर संबंधित फोन बंद झालेला असतो. बॅँकेत येऊन खाते तपासल्यानंतर पैसे गायब झाल्याचे स्पष्ट होते. या पैशाची नंतर बॅँका जबाबदारी घेत नाहीत. अशा घटना वारंवार घडू लागल्याने आता फसवणूक झालेल्या ग्राहकांप्रमाणे बॅँकांही हैराण झाल्या आहेत. अनेक बॅँकेत अशा फसव्या फोन व एस.एम.एस.पासून सावध रहा, अशा सूचना ठिकठिकाणी केल्या आहेत. काही बॅँकेत तर कॅशिअर, बॅँक काउंटर, काचेच्या दारावर अशा ठिकाणी सूचनांचे फलक लावले आहेत. एवढेच नव्हे, तर बॅँकेत पैसे भरायला व काढायला येणाऱ्या ग्राहकांनाही बॅँक कर्मचारी सूचना करू लागले आहेत.पासवर्ड विचारणारे फोन हे शक्यतो परराज्यातील असल्यामुळे ग्राहक काहीही करू शकत नाहीत, असे प्रकार वारंवार होऊ लागल्याने बॅँकांही आता अशा घटना घडल्याची एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास पोलिसांत तक्रार देऊ लागले आहेत.बॅँकांचा तीन कारणांसाठी ‘मॅसेज’बॅँकांकडून फक्त तीन कारणांसाठीच मॅसेज पाठविला जातो. तो म्हणजे, पैसे काढल्यानंतर, पैसे भरल्यावर व बॅलेन्स चौकशी केल्यानंतर या शिवाय बॅँक कोणालाही मॅसेज पाठवीत नाही, अथवा फोन करीत नाही.जनजागृती करूनही फसगतए.टी.एम.चा पासवर्ड विचारून खात्यातील पैसे गायब होऊ लागल्याने बॅँकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तरीही बॅँक ग्राहक फसत आहेत. फसगत झालेल्या ग्राहकांत सुशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असल्याचे एका बॅँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.