शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सदरबझारमधील ‘बंड्या’ बनलाय स्वच्छतादूत! अविरत सेवा : प्रामाणिकपणाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:36 IST

उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते.

ठळक मुद्देकामाचे अनेकांना कुतूहल

सातारा : उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्वं पटवून देणाऱ्या या ‘बंड्या’च्या प्रामाणिकपणाचे नागरिक भरभरून कौतुक करतात. आता तर त्याला ‘स्वच्छतादूत’ म्हणूनच ओळखले जात आहे.

सदरबझारमध्ये पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर ठेका पद्धतीने काम करणारा हा बंड्या स्वभावाने भोळा-भाबडा आहे. समोर आलेलं काम प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेकदा काही कर्मचाºयांकडून काम करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, बंड्या याला अपवाद ठरत आहे.गेल्या सात वर्षांपासून बंड्या ठेका पद्धतीने पालिकेत स्वच्छता विभागात काम करत आहे. त्याच्या घरीदेखील कोणीच नसल्याने त्याला पालिकेत काम मिळवूनदेण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला होता. मध्यंतरी त्याला ठेक्यावरून कमी करण्यात आले होते. त्यावेळी येथील स्वच्छतेवर परिणाम जाणवू लागल्याने एका अधिकाºयाने पुन्हा त्याला ठेका पद्धतीने कामावर घेतले.

स्वच्छतागृह, गटार, मरून पडलेली जनावरे, डुक्कर उचलण्याची कामे करण्यासाठी बºयाचदा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. हे कामही शक्यतो बंड्याच मार्गी लागवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छतेचा दूत बनलेला बंड्या आजही गटारातील घाण डोक्यावरून वाहून नेत असतो. त्याच्याकडे आरोग्याच्या दृष्टीने कोणतेच सुरक्षेचे साहित्य नाही. तरी देखील सांगेल ती तो कामे करतो. त्यामुळे ‘बंड्या’तील स्वच्छतादूताचे सर्वांनाच कुतूहल वाटते.

जबाबदारीने कामे पूर्णअनेक वेळा कुत्री, डुकरे मरून पडलेली असतात. दुर्गंधीमुळे नागरिक नगरसेवकांनी वारंवार फोन लावून जनावरे उचलण्याची मागणी करत असतात. मात्र, आरोग्य कर्मचारी इतरत्र कामावर आहे, असे सांगितले जाते. त्यावेळी बंड्यालाच हे मृत जनावरे उचलण्याची जबाबदारी दिली जाते.

 

आमच्या परिसरात अनेकदा बंड्याच स्वच्छता करण्यासाठी येत असतो. त्याला सांगितलेली स्वच्छता तो लगेच करतो. त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ राहत आहे.- निलोफर शेख, गृहिणी

 

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान