शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:19 IST

यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोर्इंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत.

ठळक मुद्देत्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? या चिंतेत बोटमालक आहेत. त्यामुळे बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयापर्यंत अनेक बोट मालक आले आहेत.

बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोर्इंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत. सध्या या लाँचेसना एकही पर्यटक व प्रवासी मिळत नसल्याने पंधरा दिवसांपासून या बोटी जाग्यावरच पाण्यात बांधलेल्या आहेत. परंतु या बोट मालकांना दररोज नदीकिनारी जाऊन बोटीत येणारे पाणी काढावे लागत आहे. तसेच पाण्याची पातळी सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज तीन ते चार फुटांनी घटत आहे.

त्यामुळे दररोज सकाळी नदी बाहेर कोरड्या जागेत असणारी बोट पाण्यात ढकलावी लागत आहे. त्यामुळे दररोज ही अनावश्यक धडपड करावी लागत आहे. अनेक बोट मालकांनी आपल्या बोटी आतापासूनच पाण्यातून बाहेर काढून कोरड्या पात्रात ओढून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे बोटचालकांचा चार महिन्यांचा व्यवसाय बुडाला होता. परंतु यावर्षी पाणी जास्त असूनही केवळ कोरोना संकटामुळे पर्यटक नाहीत. धंदा नाही, त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? या चिंतेत बोटमालक आहेत. त्यामुळे बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयापर्यंत अनेक बोट मालक आले आहेत. 

गतवर्षी नदीपात्र कोरडे पडले होते. यंदा नदीत पाणीही जास्त आहे. वासोट्यामुळे धंदाही चांगला होत होता. परंतु लॉकडाऊनमुळे पंधरा दिवस दररोज नदीकाठी जाऊन बोटीतील पाणी काढणे व लाँच पाण्यात ढकलणे एवढेच काम करावे लागत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हाच प्रश्न आहे.- आनंदा भोसले, बोट मालक, मुनावळे, ता. जावळी  

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरboat clubबोट क्लब