शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विजयी चौकाराने विरोधकांना बाळासाहेबांचे ‘उत्तर’!

By admin | Updated: October 20, 2014 22:36 IST

कऱ्हाड उत्तरेत शिट्टी वाजली नाही : हातावर मात करीत राष्ट्रवादी पुन्हा पुढे

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभेच्या मतमोजणीत सुरूवातीला काही फेऱ्यांत स्वाभिमानीच्या घोरपडेंनी आघाडी घेतली अन् अनेकांची ‘शिट्टी’ वाजली; पण त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ‘घड्याळा’तील मताधिक्क्याचे काटे पुढे सरकु लागले. ते काँग्रेसच्या धैर्यशिल कदमांच्या ‘हाता’ला लागले नाहीत़ सरते शेवटी २० हजार ५०७ चे मताधिक्य घेत बाळासाहेबांनी विजयाचा चौकार मारत विरांधकांना चोख ‘उत्तर’ दिलं़पाच वर्षांपूर्वी मतदार संघ पुनर्रचनेत कऱ्हाड उत्तरमधुन कऱ्हाड शहरासह १४ गावे दक्षिणेत गेली. सातारा तालुक्यातून दोन आणी खटाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट नव्याने उत्तरला जोडण्यात आला. त्यामुळे या मतदार संघाचं विजयाचं ‘उत्तर’ मिळविणं अवघड बनलं़ तरीही गत विधानसभा निवडणूकीत बाळासाहेबांनी ४२ हजारांचे मताधिक्य घेत विजयाची ‘हॅटट्रीक’ मारली़ सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र त्यांच्या पथ्थ्यावर पडले़ यंदाच्या निवडणूकीत काँग्रेस आघाडीत झालेली बिघाडी आमदार पाटलांना अडचणीची ठरेल, असे वाटू लागले़ भरीस भर म्हणून घोरपडेंचा ‘स्वाभिमान’ जागा झाला़ ऐनवेळी धैर्यशिल कदमांच्या ‘हाता’ला काँग्रेसनंही बळ दिलं़ हे ‘मनो धैर्य’ प्रस्थापितांची डोकेदुखी वाढवु लागलं़ गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् आमदार आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून धैर्यशिल कदमांनी कोट्यावधी रूपयांचा निधी या मतदार संघात आणला़ तर संवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जावून त्याचा डंकाही वाजविला़ त्याचा फायदा कदमांना मिळाल्याचे मताच्या आकड्यावरून स्पष्ट होते़ गतवेळी बाळासाहेबांच्या ‘फ्रंटलाईन आॅफ अ‍ॅक्शन’ मध्ये असणाऱ्या मनोज घोरपडेंनी यंदा मतदार संघात ‘शिट्टी’ वाजविण्याचा निर्णय घेतला़ सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या प्रचार सभा घेऊन प्रचारात गती आणली़ त्यामुळे मुख्य लढत बाळासाहेब आणि घोरपडेंच्यात होईल, अशी अटकळ बांधली गेली़; पण गेली ३ वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून तयारीत असणारे धैर्यशिल कदमच दुसऱ्या स्थानावर राहिले़ (प्रतिनिधी)मतविभागणी पडली पथ्यावर कऱ्हाड उत्तर मतदार संघात आमदार बाळासाहेब पाटील २० हजार ५०७ मतांनी विजयी झाले़ त्यांना एकूण ७८ हजार ३२४ मते मिळाली; पण त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धैर्यशिल कदम यांना ५७ हजार ८१७ तर स्वाभिमानीच्या मनोज घोरपडेंना ४२ हजार ९०३ मते मिळाली़ त्या दोघांच्या मतांची बेरीज १ लाख ७२० एवढी होते़ ही मते बाळासाहेब पाटलांना नक्कीच विचार करायला लावणारी आहेत़ कदाचित यंदाच्या या निवडणूकीत ही मतविभागणीच बाळासाहेबांच्या पथ्यावर पडली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही़ मुख्यमंत्र्यांची सभा नाहीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभर काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारासभा घेतल्या़ सातारा जिल्ह्यातही अनेक सभा झाल्या; पण चव्हाण कऱ्हाड दक्षिणेतून लढत असताना नजिकच्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघात त्यांची एकही सभा झाली नाही़ याची कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे़ सप्तरंगी लढतीत राष्ट्रवादी पुढे गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कऱ्हाड उत्तर मतदार संघात यंदा एकही अपक्ष उमेदवार नव्हता, हे विशेष ! राष्ट्रवादीसह काँग्रेस, स्वाभिमानी, मनसे, शिवसेना, बविपा, बसपा या सात पक्षांच्या उमेदवारांनी आपापले झेंडे फिरवले; पण राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा फडकावला़ राजेंसह मावळ्यांची साथ कऱ्हाड उत्तरमध्ये सातारा तालुक्यातील २ जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे़ साहजिकच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे तिथे गट सक्रिय आहेत़ या दोन्ही राजांनी बाळासाहेबांच्या पाठिशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला़ तर राष्ट्रवादी अंतर्गत अजित पवारांना मानणाऱ्या सर्व दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही बाळासाहेबांना मदत केली़ त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला़ सातारा तालुक्यातील मते राष्ट्रवादीकडेच होती. अजिंक्यतारा कारखान्यामुळे ती आधीच बांधली गेली आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंचा मतदारसंघ या गावांत येत नसल्याने निष्ठावंतांची गोची झाली होती.