शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे धरणाच्या बांधकामालाच धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढलेली झाडे मद्यपी तसेु प्रेमीयुगुलांचा आश्रय बनली आहेत. त्यामुळे बलकवडी धरण परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बलकवडी धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. वाई तालुक्याची जिव्हाळ्याची असणारी ‘जललक्ष्मी’ योजना याच धरणावर आहे. हजारो हेक्टर जमीन या योजनेच्या पाण्यावर भिजते. या भागातील अनेकांनी धरणासाठी आपल्या जमिनी देऊन स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. नागरिकांच्या त्यागामुळेच धरण परिसराचा कायापालट झाला आहे. ही बाब पाटबंधारे विभाग गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभागाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या दिवाळीची सुटी पडल्याने धरण परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक पर्यटक थेट धरणाच्या भिंतीवर जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकांना अडविणारे कोणीही नाही. याचा फायदा घेऊन पर्यटक संपूर्ण धरणावर बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडे उगविल्याने भिंतीवरील माती वाहून गेल्याने दगडाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणाची सुरक्षा धरणावर झाडे उगविल्याने धोक्यात आली आहे. अनेक धरणांना झाडाझुडपांमुळे गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अशी अनेक उदाहरणे समोर असताना बलकवडी धरणाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने भिंतीवरील झुडपे तातडीने काढावी तसेच याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.झाडाझुडपात बाटल्यांचा खच...धरण परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून हे चित्र दररोज पहावयास मिळते. या ठिकारी झाडाझुडपात दारूच्या बाटल्यांचा खच साचला असून बाटल्यांचे प्रमाण दररोज वाढतच चालले आहे. त्यामुळे धरण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. या धरणाच्या सुरक्षेविषयी अनेकवेळा आवाज उठवूनही पाटबंधारे विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी पाटंबधारे विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.