चाफळ : चाफळ विभागातील शिंगणवाडी येथील ग्रामस्थ, महिला व तरुणांनी गावात नव्याने सुरु करण्यात येणाºया बिअर बारच्या परवानगीस तिव्र विरोध करत बारला परवानगी देवु नये, अशी मागणी केली होती. त्याबाबतचे निवेदन प्रशासनालाही देण्यात आले असून परवानगी दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चाफळच्या दक्षिणेस दोन किलोमिटर अंतरावर शिंगणवाडी हे गाव आहे. जेमतेम ८२७ च्या घरात लोकसंख्या असणाºया या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. असे असताना गावातील काही विघ्नसंतोषी मंडळी गावात बिअर बारला परवानगी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकिकडे शासन दारु बंदीसाठी बिअरबार बंद करत सुटले असताना दुसरीकडे मात्र चिरीमिरीसाठी गावातील काहीजण गावची शांतता भंग करुपाहत आहेत. याबाबत महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. महिलांनी या बारला तिव्र विरोध दर्शवत परवानगीचा ठराव संबंधितांना देऊ नये, अशी मागणी केली. त्याबाबतचे निवेदन माजी सरपंच संगिता पवार यांच्याहस्ते ग्रामपंचायतीला देण्यात आले. त्यानंतर बोलवण्यात आलेल्या सार्वत्रीक ग्रामसभेत महिला व उपस्थीत ग्रामस्थांनी विरोध करताच उपसरपंच प्रदिप पवार यांनी आक्षेप घेत गावातील माजी सैनिकांचीही दारू बंद करा, अशी सुचना मांडली. यावर माजी सैनिक यशवंत पवार व लक्ष्मण पवार यांनी आक्षेप नोंदवल्याने वातावरण चांगलेच तापले. काहीकाळ वादावादी घडल्यानंतर ग्रामसभा संपल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहिर केले. |
बिअरबारचा घाट, शिंगणवाडीत महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:13 IST
चाफळ : चाफळ विभागातील शिंगणवाडी येथील ग्रामस्थ, महिला व तरुणांनी गावात नव्याने सुरु करण्यात येणाºया बिअर बारच्या परवानगीस तिव्र विरोध करत बारला परवानगी देवु नये, अशी मागणी केली होती. त्याबाबतचे निवेदन प्रशासनालाही देण्यात आले असून परवानगी दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.चाफळच्या दक्षिणेस दोन किलोमिटर अंतरावर शिंगणवाडी हे गाव आहे. ...
बिअरबारचा घाट, शिंगणवाडीत महिला आक्रमक
ठळक मुद्देबिअर बारच्या परवानगीस गावाचा तिव्र विरोध परवानगी दिल्यास तिव्र आंदोलनाचा इशारामहिलांची विशेष ग्रामसभा, काहीकाळ वादावादी माजी सैनिकांचीही दारू बंद करण्याची सुचना आक्षेप नोंदवल्याने वातावरण तापले