लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात बहुजन मुक्ती पार्टीला अच्छे दिन आहेत. संघटनेचे विचार ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचवा तसेच पक्ष संघटन मजबूत करा. आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बहुजन मुक्ती पार्टी लढणार असल्याचा इशारा राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी दिला.
सातारा येथील कार्यकर्ता संमेलन व बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग, हंबीरराव बाबर, अमृत सूर्यवंशी, संजय रुद्राक्ष, सागर भोसले, राहुल जाधव, सोमनाथ आवळे, सुमित जाधव, विश्वास गायकवाड आदी उपस्थित होते. मखरे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुजन क्रांती पार्टी स्वबळावर लढवणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जिल्ह्यात पार्टीला अच्छे दिन आहेत. अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत असून सर्वानी पक्षबांधणीवर भर देणे गरजेचे आहे.
मोतलिंग म्हणाले, जिल्ह्यात पक्षवाढीसाठी बांधणी सुरू आहे. पक्षाच्यावतीने लवकरच जिल्ह्यात जनसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यातील बहुजन समाजातील लोकांवर होत असलेल्या अन्यायासह विविध सामाजिक प्रश्नावर लढा उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.