शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बाळ आयसीयूत, आईची घालमेल थांबवली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशू वाॅर्डमध्ये भंडाराच्या घटनेनंतर बाळांच्या आईच्या मनात थोडी रुखरुख होती. मात्र, परिचारिकेंनी माता बनून ...

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशू वाॅर्डमध्ये भंडाराच्या घटनेनंतर बाळांच्या आईच्या मनात थोडी रुखरुख होती. मात्र, परिचारिकेंनी माता बनून बाळाची घेतलेली काळजी आईंना निर्धास्त करण्यास कारणीभूत ठरतेय.

भंडारा येथील घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील शिशू वाॅर्डमध्ये काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली असता अनेक चांगल्या बाबी समोर आल्या. प्रसूतीनंतर काही मातांच्या बाळांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाळांची रात्रंदिवस परिचारिका काळजी घेत आहेत. एखादं बाळ रडलं तरी पटकन त्या बाळाला आईचं दूध पाजलं जात. आईंना तुम्ही निर्धास्त राहावा, इथे जोपर्यंत मुले आहेत. तोपर्यंत ही मुले आमचीच आहेत, असा विश्वास सर्वच आईंना देण्यात आलाय. त्यामुळे भंडारा येथील घटना आईंच्या मनाला शिवतही नाही. बाळाला कसे सांभाळायचे इथंपासून ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन कसे करायचे, याची इत्यंभूत माहिती परिचारिका देत असतात. त्यामुळे बाळांच्या आई अगदी निर्धास्त असतात. रात्री ड्युटीवर असलेल्या परिचारिका अत्यंत सावध असतात. बाळाचा थोडा आवाज झाला तरी त्या धावून जातात. गरज पडली तरच आईंना झोपेतून उठवतात. त्यांना पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी सर्व परिचारिका आणि डाॅक्टरही प्रयत्नशील असतात. एकाही मातांनी इथली तक्रार केली नाही. उलट सर्व माता भरभरून बोलत होत्या. या परिचारिका आमच्या बाळाच्या माता बनल्या, हे पाहून आम्ही गहिवरून जातोय, असे प्रसूती झालेल्या मातांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सहा दिवसांपूर्वी बाळाला धाप लागत होती. परंतु, आता बाळाची प्रकृती सुधारतेय. परिचारिकेंनी अत्यंत चांगली काळजी घेतली. आम्हाला बाळाची कशी काळजी घ्यायची, हे त्यांनी शिकवले.

-शैला जाधव, नुने, ता. सातारा

गत चाैदा दिवसांपासून माझं बाळ इथं उपचार घेतंय. अत्यंत योग्य काळजी घेतली जात आहे. रात्रीचं बाळ रडलं तर आम्हाला झोपेतून उठवून दूध पाजण्यास सांगतात.

-धनश्री सावंत, गोगावले, ता. कोरेगाव

पाच दिवसांपासून माझं बाळ इथं आहे. त्याला ताप येत होता. त्यामुळे त्याला काचेमध्ये ठेवलंय. परिचारिका काळजी घेतात. त्यामुळे मी निर्धास्त असते.

-श्रीदेवी सलगोंड, उबराणी, विजापूर

शिशू वाॅर्डमध्ये बाळांवर उपचारांसाठी अत्याधुनिक मशीन आहेत. परिचारिका रात्रंदिवस सतर्क असतात. मातांना कसलीही काळजी लागणार नाही, अस बाळांचं संगोपन शासकीय रुग्णालयात केले जातंय.

- डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा