सातारा : ‘पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, झाडे वाचवा’ असा संदेश देत पुण्यातील दोन युवक व दोन युवतींनी पुणे ते जिंजी असा सायकल प्रवास करून नागरिकांमध्ये प्रबोधन केले. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. डॉ. अभिजित गुरव, नगरसेवक शशिकांत गुरव, रूपाली शुक्ल, सुशील शुक्ल आदींनी या सायकलपटूंचे सातारकरांच्या वतीने स्वागत केले.
पुण्यातील सायकलपटू महेश निम्हण आणि त्यांची पत्नी अमृता निम्हण, सायकल क्वीन उत्कर्षा बारभाई व विपुल गुजर हे चौघे ‘पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा’, ‘प्रदूषण कमी करा’ असा संदेश देत पुणे ते मराठ्यांची राजधानी असलेल्या जिंजी असा तेराशे किलोमीटर सायकलवरून प्रवास करत आहेत. या प्रवासात ते शहरात, गावात नागरिकांना भेटून पर्यावरणाचा संदेश देत आहेत. नागरिकही त्यांच्या या उपक्रमाला दाद देत असून, ‘पर्यावरण वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’ असे आश्वासन देत आहेत.
या सायकलस्वारांनी पुणे ते राजगड, पुणे ते रायगड, पुणे ते अजिंक्यतारा प्रवास करून छ. शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे व स्वच्छता आणि पर्यावरण संदेश दिला आहे व पुढे जिंजीकडे निघून गेले.
फोटो : ०७ सायकल रॅली
पुणे येथील सायकलपटू पुणे ते जिंजी सायकलवर प्रवास करून नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत आहेत.