शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

चित्र फलकांमधून वन्यप्राण्यांबाबत जनजागृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:13 IST

सागर चव्हाण । पेट्री : साताऱ्यातील बोगदा ते बामणोली मार्गावर सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या मार्फत रस्त्याकडेला विविध प्राणी ...

ठळक मुद्देसातारा-बामणोली रस्ता । निसर्ग संरक्षण, वन्यजिवांच्या संरक्षणासाठी प्रबोधन

सागर चव्हाण ।पेट्री : साताऱ्यातील बोगदा ते बामणोली मार्गावर सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या मार्फत रस्त्याकडेला विविध प्राणी व पक्ष्यांचे सचित्र तसेच उद्बोधनपर घोषवाक्ये असलेले सुामरे ६५ माहिती फलक उभारले आहेत. याद्वारे पर्यावरणाचे संतुलन, निसर्गाचे संरक्षण, संर्वधन तसेच वन्यजिवांच्या संरक्षणासाठी जनजागृती केली जात आहे. परिसरात पर्यटनास येणाºया पर्यटकांचे प्रबोधन करण्यास या फलकाची मदत होते.

काससह बामणोली, तापोळा भागात पर्यटनास येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरात पर्यटक वर्षभर फिरायला येतात. फुलांच्या हंगामात तर लाखोंच्या संख्येने पर्यटक या परिसराला भेट देत असतात. किल्ले वासोट्याकडे जाणाºया पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण, वन्यजीवांच्या रक्षणासाठी परिसरात पर्यटनास येणाऱ्यांमध्ये उद्बोधन व्हावे, यासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर स्टिथ कºहाड यांच्यामार्फत सातारा (बोगदा) ते बामणोली या मार्गावर रस्त्याकडेने विविध वन्य पशुपक्षी तसेच ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषणासह पर्यटकांकडून होणा-या प्लास्टिक घनकचºयावर मार्मिक टिप्पणी करणाºया छायाचित्रांचे साधारण ६५ माहिती फलक उभारण्यात आले आहेत.

दरवर्षी शहराच्या पश्चिमेस विघ्नसंतुष्टांकडून मोठ्या प्रमाणावर वणवा लावला जातो. त्यामध्ये शेकडो टन चाºयासह कित्येक झाडे होरपळून मुक्या जीवांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. विघ्नसंतुष्टाकडून वणवा लावला जाऊ नये तसेच या विकृत प्रवृत्तीची मानसिकता बदलण्यासाठी या माहिती फलकांचा उपयोग होण्यास मदत होत आहे.

कास, शेंबडीमठ, वासोटा (व्याघ्रगड ), चकदेव, उत्तरेश्वर, आरवचे देवराई पर्वत, महिमानगड असे बामणोली वन्यजीव वनक्षेत्रात पर्यटनाचे विविध ठिकाणे आहेत. या पर्यटनाच्या ठिकाणांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. त्यांच्यात पर्यावरण संतुलन तसेच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी छायाचित्रांसह उभारण्यात आलेल्या माहिती फलकांद्वारे जनजागृती होण्यास मदत होत आहे.

कोणत्याही अपप्रवृत्तीमुळे प्राण्यांना इजा पोहोचणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणाने वन्यजीवांच्या अधिवासात बदल होणार नाही, यासाठी विवेकपूर्ण जाणीवपूर्वक आपल्या निसर्गाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

 

  • .... जंगलात फिरण्याचा माझा हक्का!

‘नो हॉर्न, वाईल्ड लाईफ क्रॉसिंग झोन’, ‘ड्राईव्ह स्लोली,’ ‘अतिथी देवो भव:’ ‘देव कचरा करत नाही’, ‘नियमाला देऊ जोड शिस्तीची’, ‘पवित्र ठिकाणी योग्य कृतीची ( स्वच्छता राखा)’, ‘जंगल क्षेत्रात घाण करू नका’, ‘आम्हालाही आहे जगण्याचा अधिकार’, ‘जंगलात फिरण्याचा माझा हक्क’, ‘भरधाव गाडी चालवण्याचा नका करू हट्ट’, ‘सुरेख हे पक्षी निसर्ग रक्षी’ आदी उद्बोधनपर घोषवाक्ये फलकावर लिहिली आहेत.

 

  • यांनाही जगण्याचा अधिकार

सातारा-बामणोली मार्गावर उभारण्यात आलेल्या विविध प्राणी पक्षी यांच्या सचित्र माहिती फलकांद्वारे पर्यावरण, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन तसेच वन्यजीवांचे रक्षण होण्यासाठी जनजागृती होण्यास मदत आहे. तसेच जसा मानवाला जगण्याचा अधिकार आहे, तसा मुक्या वन्यजीवांनाही जगण्याचा अधिकार आहे. यामुळे या माहिती फलकाद्वारे प्रबोधन होण्यास मदत होणार आहे,’ असा विश्वास बामणोलीच्या वन्यजीव विभागाचे वनपाल सागर कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

 

सातारा-बामणोली मार्गावर उभारलेल्या सचित्र माहिती फलक पर्यटक तसेच वाहनचालक वाहने चालविताना सतत नजरेस येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निसर्ग, वन्यजीवांचे तसेच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होत आहे.- हेमंत साळुंखे, पर्यावरणप्रेमी सातारा

 

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर