सातारा : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघातर्फे बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्ध तेथून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमला होता.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात करत आमदार शिंदे आणि इतर वारकऱ्यांनी टाळ वाजावून बंडा तात्यांच्या स्थानबद्धतेचा निषेध केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध केले आहे, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण असून बंडा तात्यांना मोजक्या वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.या आंदोलनाबाबतची भूमिका व्यक्त करताना आमदार महेश शिंदे म्हणाले, इतर राजकीय कार्यक्रमांसाठी दीड दोन हजार लोक एकत्र आले. मात्र वारीला परवानगी दिली जात असल्याने महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये वेगळी भावना आहे. वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी काढणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अध्यात्मिक शक्तींना रोखणे चुकीचे होईल. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि वारकरी यांचा जुना ऋणानुबंध आहे. ते निश्चितपणाने मोजक्या लोकांच्या वारीला परवानगी देतील, अशी खात्री आहे.दरम्यान पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या या कोंडीतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी अध्यात्मिक शक्तीच कामी येणार आहे. या शक्तीला रोखून धरणे चुकीचे ठरेल. दाऊ आंदोलन अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा वारकरी यांनी केलेले आंदोलन सगळ्यांनाच माहित आहे त्या पद्धतीचे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर निश्चितपणे येणार नाही, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.
बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:00 IST
shivsena satara : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.
बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!
ठळक मुद्देशिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांचे आंदोलनकोरोनाच्या काळात अध्यात्मिक शक्ती महत्वाची असल्याचा दावा