शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास-: फुरसुंगीच्या बापूराव गुंडे यांची राज्यभर मोहिम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:03 IST

मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. 

ठळक मुद्देअनोखी तळमळ

सागर गुजर

सातारा : मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. साताºयातील प्रमुख चौकांमध्ये मंगळवारी शिट्टीचा आवाज येत होता. पोलीस अधीक्षकांच्या परिपत्रकामुळे वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर दिसणे दुर्मीळ झाले असताना शिट्ट्या कोण मारतंय, हे पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना एक सहा फुटांचा धिप्पाड देह नजरेस पडला. अंगात पांढरा सदरा आणि लेंगा घातलेला! या संपूर्ण पोषाखावर मतदान जागृतीचा संदेश लिहिलेला पाहायला मिळत होता. डोक्यात टोपी त्यावरही मतदान करा, असा संदेश लिहिलेला. तेच बापूराव गुंड! शिट्टी वाजवून ते लोकांचे लक्ष वेधून घेत होते. मतदान करा, असा संदेश ते देत होते.  

पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने बाईकवरून प्रवास सुरू केला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले पाहायला मिळत होते. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव गुंड यांनी मतदान जागृतीचा प्रयोग स्वखर्चातून सुरू केला आहे. गुंड हे कापड विक्रेते आहेत. मात्र निवडणुकांत मतदानाचा घटलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागला. सरकार निवडताना सर्वच जनतेने पुढे यावं, असं त्यांचं मत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये ते मतदान जागृतीसाठी घराबाहेर पडतात. 

गुंड यांच्याकडे असणाºया बाईकमध्ये ते स्वत:च्या खिशातील पैशाने पेट्रोल टाकतात. मंगळवारी ते पुण्यातून जागोजागच्या गावांत मतदान जागृती करत साताºयात आले होते. साताºयातून ते कºहाड, कोल्हापूरकडे जाणार होते. ३० ते ३५ दिवसांच्या दौºयात बसस्थानक, मंदिरात ते मुक्काम करतात. दुसºया दिवशी पुन्हा ‘आय विल ओट...तुम्हीही मतदान करा,’ असा संदेश देत प्रवास  करतात.

तेव्हाच प्रवास थांबेल

जोपर्यंत देशात ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत १०० टक्के मतदार मतदान करणार नाहीत, तोपर्यंत ही जागृतीची मोहीम सुरूच ठेवणार आहे, असे बापूराव गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, चोख कर्तव्य पार पाडा, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होते. बाकीचे ४० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे लोकांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी मी ३५ वर्षांपासून असा पोषाख घालून प्रचार करतो आहे.- बापूराव गुंड, फुरसुंगी (पुणे) 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण