शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

औंध, सुरवडीत डॉल्बीला दणका

By admin | Updated: August 20, 2016 00:25 IST

ग्रामस्थांसह मंडळांचा पुढाकार : गणेशोत्सवात घुमणार पारंपरिक वाद्यांचा ‘आव्वाज’--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

साखरवाडी : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावाचा, नाय डॉल्बीचा’ या चळवळीला आंध तसेच सुरवडी गावात यश आले असून, सुरवडीतील ग्रामसभेत ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनीच गावामध्ये डॉल्बीमुक्तीसह अवैध धंदे बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तर औंध येथे झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीतही मंडळांकडून या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.सुरवडी, ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम प्राथमिक शाळा सुरवडीचे प्रांगणात पार पडला. यावेळी गावचे नवनिर्वाचित पोलिस पाटील संतोष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील हे होते. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कारासह खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी गेली वर्षभर चर्चेत असलेला आणि काही युवकांच्या हट्टापायी यापूर्वी निर्णय होऊ न शकलेला डॉल्बीबंदीचा विषय ग्रामसभेत वादळी ठरला. यावेळी ग्रामस्थांनी डॉल्बीचे दुष्परिणाम व वयोवृद्ध आणि रुग्णांवर होणारे परिणाम या विषयावर चर्चा केली आणि यातून युवकांनीच मार्ग काढण्याचे आवाहन केले असता उपस्थित सर्व युवकांनी आजपासूनच डॉल्बीबंदीचा निर्णय घेण्यात यावा आणि गावात सुरू झालेले अवैध धंदेही पूर्णपणे बंद करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’च्या डॉल्बीबंदी चळवळीचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला. यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगल माडकर होत्या. यावेळी प्रामुख्याने गावचे विकास आराखडा, स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त गाव तसेच पाणीपुरवठा, वीजवितरण कंपनी, आरोग्य खाते, पशुसंवर्धन आदी विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.यावेळी सरपंच मंगल माडकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, सदस्य शिवाजी जाधव, रंजना साळुंखे, रंजना पवार, जाधव, मुख्याध्यापिका आतार, अंगणवाडी सेविका मदतनीस, कृषी, पशुसंवर्धन खात्याचे प्रतिनिधी व केंद्रप्रमुख राजाराम जगताप आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीचे काम लवकरच हातीग्रामसभेत स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त गाव, गावचा विकास आराखडा, कृषी विभागाच्या योजना, पशुवैद्यकीय खात्याच्या योजना, याबाबत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच गावच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न ही जागेच्या उपलब्धतेमुळे मार्गी लागला असून, अद्ययावत स्मशानभूमीसाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येऊन कामही सुरू करण्यात येणार असल्याचे धनंजय साळुंखे-पाटील यांनी सांगितले...अन्यथा डॉल्बीसह वाहन जप्त : काळेऔंध : ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा अवलंब करावा, सर्व आवश्यक परवानगी घेऊन गणेशोत्सव डॉल्बीमुक्त भक्तिमय वातावरणात साजरा करा, डॉल्बी लावलेली निदर्शनास आल्यास डॉल्बी व वाहन जप्त करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी दिल्या.औंध येथे पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित औंध परिसरातील ४० गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, वडूजचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, आलीम मोदी, रवी थोरात, विनोद थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. काळे म्हणाले, ‘प्रत्येक मंडळांनी गणेशोत्सव काळात किमान चार कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र हजर राहून मूर्ती, देखावे व सजावटीचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी. मिरवणुका शांततेत काढण्याची सूचनाही यावेळी त्यांनी दिली.’विकास जाधव म्हणाले, ‘मंडळांनी जागा मालकाचे संमतीपत्र, अधिकृत लाईटचा वापर, रहदारीस अडथळा होऊ नये, अशा ठिकाणी शेड, आक्षेपार्ह देखावा नसावा. अनावश्यक बोर्ड लावू नये तसेच जलसंधारण, बेटी बचाव, स्वदेशी असे देखावे तयार करा, गोरगरीब हुशार मुलांना दत्तक घ्या, असे समाजपयोगी कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आलीम मोदी, बापूसाहेब कुंभार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)एक खिडकी योजना २५ आॅगस्ट पासून‘एक खिडकी योजना’ ही येत्या २५ तारखेपासून औंध पोलिस स्टेशनमधून मंडळांना सर्व आवश्यक परवाने या योजनेद्वारे दिले जातील, त्यामुळे ज्यांची नोंदणी नाही त्यांना सुद्धा नोंदणी करता येणार आहे.