शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पोलीस दलाकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हुतात्म्यांमुळे बदलला

By admin | Updated: November 28, 2014 00:15 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिपादन

भुर्इंज : ‘सातारची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. इथल्या मातीने क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्यासारख्या रत्नांबरोबरच २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारखा धाडशी पोलीस अधिकारीही दिला आहे. या वीरांनी राज्यातील जतनेचा पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले. किसन वीर कारखाना कार्यस्थळावर २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना आणि संविधान दिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, भुर्इंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, ‘तुकाराम ओंबळेंनी कसाबला पकडले नसते, तर मुंबईत आणखी लोक मारले गेले असते. दहशतवाद्यांचे मनसुबे जगाला कळले नसते. ओंबळेंनी देशभक्तीने प्रेरित होऊन हिमतीचे काम केले. त्यांच्यासह या हल्ल्यातील हुतात्म्यांचे कल्पनाशक्तीचा योग्य वापर करत उचित स्मारक उभारून मदन भोसलेंनी देशभक्तीतून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. कारखान्याने उभारलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थळ आहे.’ प्रारंभी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल व कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी कारखान्याचे संचालक संचालक नारायणराव पवार, नंदाभाऊ जाधव, हणमंतराव पिसाळ, चंद्रकांत इंगवले, सुभाष साळुंखे, संदीप पोळ, अशोक मोरे, रोहिदास पिसाळ, अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, किसनराव कदम, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, लालसिंग जमदाडे, सचिन साळुंखे, सुनंदा चव्हाण, कार्यकारी संचालक विजय वाबळे, मोहनराव भोसले, प्रल्हाद चव्हाण, बापूसाहेब शिंदे, सतीश भोसले, धनाजी डेरे, प.ना. पोतदार, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव पवार, नवनाथ केंजळे, बाळासाहेब कांबळे, विलासराव जाधव, मधुकर शिंदे, शिवाजीराव जाधव-पाटील, उपस्थित होते. (प्रतिनिधी)