शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली सातारानगरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष-लक्ष दिव्यांनी सातारा शहर उजळून निघाले होते. वसाहती, बंगले, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी घराचे अंगण, दुकानांसमोर सडा-रांगोळी अन् पणत्या लावून आकर्षक सजावट ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष-लक्ष दिव्यांनी सातारा शहर उजळून निघाले होते. वसाहती, बंगले, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी घराचे अंगण, दुकानांसमोर सडा-रांगोळी अन् पणत्या लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.साताºयात सायंकाळी सव्वा सहानंतर लक्ष्मी पूजनाला प्रारंभ झाला. घरोघरी, दुकानांमधून कुबेर-लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सुमारे दोन तास पूजन करण्यात आले असले तरी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती. राजवाडा, पोवई नाका, राजपथावर सर्वाधिक आतषबाजी सुरू होती. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.यंदा साताºयाच्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त नवी दालने सुरू झाली आहेत. या दुकांनामध्येही लक्ष्मी पूजन शास्त्रोक्तपद्धतीने करण्यात आले. घरातल्या लहान मुलांसह महिलांनीही नवे कपडे परिधान करून लक्ष्मी पूजन केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती.यवतेश्वरमध्ये लक्ष्मी पूजनादिवशी यात्रायवतेश्वर येथे लक्ष्मी पूजनादिवशी यात्रा भरते. या यात्रेला यवतेश्वर, आंबेदरे, सारखळ, गवडी, सांबरवाडी तसेच सातारा शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंब्याचा मोहर. पूर्वीपासूनच या यात्रेत आंब्याचा मोहर शोधण्याचा मान गुरव समाजाला असतो. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ‘यवतोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात पालखीची मिरवणूक आंब्यापर्यंत काढण्यात आली. आंब्याचा मोहर पुजारी हातात घेऊन पालखी पुन्हा मंदिराकडे येते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी असते.