सातारा : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे घरात शिरलेल्या चोरट्यास चोरट्यास प्रयत्न करणाऱ्या जवानास चोरट्याने दगड पायावर मारून जखमी केले. याप्रकरणी अक्षय संभाजी आढावा (रा. क्षेत्रमाहुली) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, संशयित अक्षय आढाव हा क्षेत्रमाहुली येथील मदनराव नवनाथ शिंदे यांच्या घरात शिरला होता. घरातील कपाट उचकटून चोरीचा प्रयत्न करत असतानाच मदनराव शिंदे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आढाव याने मदनराव शिंदे यांच्या पायावर लोखंडी बार आणि दगडाने मारले. यामुळे शिंदे यांच्या पायास इजा झाली आहे. दरम्यान, आढाव याने गावातील संदीप पंडित यांच्याही घरात चोरीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अक्षय आढाव याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
क्षेत्र माहुली येथे चोरीचा प्रयत्न; एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:49 IST