शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात विविध संघटनांचा हल्लाबोल, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:02 IST

वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

सातारा : वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सातारा येथे सर्व क्षेत्रातील कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपाची तयारी केली होती. राज्य कर्मचारी, बँक, पोस्ट, बीएसएनएल, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

या आंदोलनात अंगणवाडी, बांधकाम कामगार व अन्य संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला. बेरोजगारी, नोकरभरती, कंत्राटी कर्मचारी कायम करणे, खासगीकरण, सार्वजनिक उद्योगांची विक्री आणि खासगीकरणास विरोध, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना निश्चित पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या खासगीकरणास विरोध, योजना कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन आणि मान्यता मिळावी, मालकधार्जिन्या कामगार कायद्यातील बदलांना विरोध, संरक्षण व इतर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्यास विरोध आदी बाबत हा संप पुकारण्यात आला.दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महसूल विभागातील काम पूर्णत: ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ग्रामीण भागात बंद ठेवण्यात आला होता.

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी करारावर केंद्र सरकारने स्वाक्षरी करु नये, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीपंपाचे वीज बिलमाफी व इतर प्रमुख मागण्यांसाठी सातारा-कोरेगाव हा रस्ता बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रोखण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.बुधवार ठरला आंदोलन डेशासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बुधवारी मोर्चे, रास्ता रोको, धरणे, निदर्शने अशी आंदोलने केली. विविध संघटनांच्या या आंदोलनांमुळे बुधवार हा आंदोलन  डे ठरला.

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर