प्रेमविवाहच्या कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:02 PM2018-05-10T16:02:24+5:302018-05-10T16:02:24+5:30
पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातारा तालुक्यातील काळोशी येथे बुधवारी रात्री मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांनी मुलाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला.
सातारा : पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातारा तालुक्यातील काळोशी येथे बुधवारी रात्री मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांनी मुलाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने हल्ला केला. यात चारजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये एका जवानाचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, अमोल उत्तम निकम (वय ३४, रा. काळोशी, ता. सातारा) यांचा भाऊ नीलेश याने येथील कोमल लामजे हिच्या सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्याच्या रागातून बुधवारी मध्यरात्री माजी सैनिकलक्ष्मण किसन लामजे, जवान सूरज लक्ष्मण लामजे, पंकज लक्ष्मण लामजे, लक्ष्मण रावसाहेब डफळ, अनिकेत लक्ष्मण डफळ, हृषीकेश विलास शेलार (सर्वरा. काळोशी) मनोहर किसन लामजे, रामचंद्र किसन लामजे, किसन आप्पा लामजे,
सुनील सर्जेराव देशमुख (सर्व रा. कुरुण), प्रवीण साहेबराव लोंढे, साहेबराव पंढरीनाथ लोंढे (रा. जकातवाडी) व इतर चार ते पाच जणांनी त्यांच्या हातातील कुºहाड, दांडके व हॉकी स्टीकने मारहाण केली. यात अमोल निकम, सतीश निकम, शिवराम निकम व उषा निकम हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव तपास करीत आहेत.