शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण तापले

By admin | Updated: November 15, 2016 00:32 IST

परस्परांना चितपट करण्याचा निर्धार : सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांची ठोस भूमिका- खंडाळा नगरपंचायत

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीसाठी प्रमुख पक्षांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. सत्ताधारी पक्षाला खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांनी ठोस भूमिका घेतली आहे. आजवरच्या आखाड्यात किंचीतसी माघार घ्यावी लागल्याने यावेळी काही झाले तरी कुस्ती चितपट करायचीच याचा पक्का निर्धार करून विरोधकही प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे ऐन थंडीतही प्रचाराच्या रणधुमाळीने राजकीय वातावरणात गरमागरमी जाणवत आहे.खंडाळ्याच्या राजकारणात आजपर्यंत दबदबा राखलेल्या काँग्रेसला प्रत्येक प्रभागात कडवे आवाहन निर्माण करत राष्ट्रवादी काँग्रेसने मूळ मुद्द्यांना हात घातला आहे. कोट्यवधी रुपयांची शहरातील विकासकामे हे काँग्रेसचे प्रमुख भांडवल आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा अजेंड्यावर ठेवण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला उखडून टाकण्यासाठी शहराची दुरवस्था, मूलभूत विकासाची वाणवा यांची जंत्रीच तयार करून राष्ट्रवादी आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी मैदानात जंग लढण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये दोन्ही पक्षांना तरुणांची साथ हा बळकटीचा भाग बनला आहे.पूर्वाश्रमीच्या खंडाळा ग्रामपंचायतीचा कारभार आणि काँग्रेस पक्षात शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून राबवलेली सामाजिक उपक्रमाचा हाताला आधार देऊ शकतो. ग्रामपंचायतीच्या उत्कर्षामध्ये सध्याच्या राष्ट्रवादी नेत्यांचा असलेला सहभाग आणि राष्ट्रवादी पक्षात गजराज मित्र मंडळाची समाजोपयोगी कार्यक्रम आणि त्यातून केलेले तरुणांचे संघटन ही राष्ट्रवादीची जमेची बाजू ठरू शकते. याउलट काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेला भाजपाचा गट आपले वेगळे बस्तान निर्माण करू पाहत आहे. मात्र, या कमळाच्या पाकळ्या किती? असा प्रश्न असल्याने त्याकडे डोळेझाक केली जात आहे. तर जय महाराष्ट्राचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे दोन शिलेदार मैदान राखण्याचा प्रयत्न करत आहेत. लढाईपूर्वीच सेनेच्या मावळ्यांनी रणांगणातून धूम ठोकल्याने पक्षाची अवस्था केविलवाणी होऊ शकते. त्यामुळे सेना किती तग धरणार हे प्रचाराच्या रणनीतीवरच अवलंबून राहणार आहे. काँग्रेसची प्रचाराची धुरा पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या एकहाती नेतृत्वावर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठांशिवाय नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक प्रमुखांनी घेतल्याने कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले आहेत. मात्र, आमदार मकरंद पाटील यांच्या धुरंधर नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आगेकूच करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तालुका पदाधिकारी आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या अनेक सुभेदारांची मैदानातील तोफ धडाडणार असल्याने निवडणुकीचे वातावरण रंगतदार बनत चालले आहे. पहिलाच प्रयत्न करणाऱ्या भाजपाने मात्र, दिग्गज मंत्र्यांच्या सभांचे नियोजन करून धडाका उडवून दिला आहे. तर सेनेला धनुष्याचा आधारच वाटत नसल्याने तीर कोठे मारावा या संभ्रमात शिवसैनिक अडकले आहेत. तरीही या निवडणुकीत इतिहास घडविण्यासाठी प्रत्येक पक्षांनी आपापले आडाखे तयार ठेवल्याने प्रचार रंगतदार होणार आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्ष पदाच्या प्रभागात चुरसखंडाळ्याचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यासाठी आरक्षित असलेल्या पाच प्रभागांत काट्याची टक्कर होणार आहे. सेनापतींचाच प्रभाग सुरक्षित राहावा यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. त्यातूनही १२ व १७ प्रभागांत मोठी चुरस निर्माण झाली असल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.