शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’ घोटाळा; तिघांना सक्तमजुरी सांगलीतील प्रकरण : पैसे न भरता हडप; बँकांना सव्वा कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:01 IST

‘एटीएम’च्या यंत्रात पैसे न भरता, ते परस्पर हडप करुन दोन बँकांना सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या तिघा संशयितांना शुक्रवारी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. २०११ मध्ये एटीएमचा हा घोटाळा उघडकीस

सांगली : ‘एटीएम’च्या यंत्रात पैसे न भरता, ते परस्पर हडप करुन दोन बँकांना सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या तिघा संशयितांना शुक्रवारी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. २०११ मध्ये एटीएमचा हा घोटाळा उघडकीस आला होता.

सलीम हमीद शेख (वय ३०, रा. अष्टविनायकनगर, विश्रामबाग), निहाल अहमद दस्तगीर मुल्ला (३१) व ख्वाजा अमीर कलंदर तांबट (२९, दोघे रा. कुपवाड) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. सलीम शेख याला पाच वर्षे, तर अहमद मुल्ला व अमीर तांबट यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आर. पाटील यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे अ‍ॅड. एम. आर. किल्लेदार, अ‍ॅड. एस. एम. पखाली व पी. पी. हजारे यांनी काम पाहिले.

बँक आॅफ महाराष्ट व अ‍ॅक्सीस बँकेने त्यांच्या सांगली, तासगाव, आष्टा व जयसिंगपूर येथील अकरा शाखांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचा ठेका दिल्लीतील सिक्युटिरी इंडिया कंपनीकडे दिला होता. यासाठी कंपनीने सलीम शेख याची नियुक्ती केली होती. या कामासाठी सलीमने निहाल व ख्वाजा तांबट या दोघांना मदतीसाठी घेतले होते. हे तिघे मिळून सिक्युटिरी इंडिया कंपनीसाठी या बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम पाहात होते.

या अपहारप्रकरणाचा सूत्रधार असलेला सलीम शेख काम करत असताना बँकांच्या कामकाजाच्या पध्दतीवर लक्ष ठेवून होता. संधी मिळताच वेळोवेळी या तिघांनी १ जुलै २००८ ते २८ डिसेंबर २०११ या कालावधित तब्बल एक कोटी ३४ लाख ९२ हजार पाचशे रुपयांची रोकड एटीएममध्ये न भरता परस्पर हडप केली होती. एटीएम घोटाळ्याचे हे प्रकरण उघडकीस येताच बँक आॅफ महाराष्ट्र व अ‍ॅक्सीस बँक व्यवस्थापनास धक्काच बसला होता. याप्रकरणी कंपनीचे बाळासाहेब मिसाळ यांनी विश्रामबाग व शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता.तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व सहायक निरीक्षक अश्विनी बिद्रे यांनी तपास केला होता. सलीम शेखसह तिघांना अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. सरकारतर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले.सलीम कारागृहातसलीम शेख हा सध्या कारागृहातच आहे. निहाल मुल्ला व ख्वाजा तांबट हे दोघे जामिनावर बाहेर आहेत. शिक्षेसोबत सलीमला पन्नास हजाराचा, तर निहाल आणि ख्वाजाला प्रत्येकी तीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने जादा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेले ७५ हजार रुपये सरकारकडे जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.