शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

उदयनराजेंच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या गळ्यातील चेनवर डल्ला

By दत्ता यादव | Updated: June 5, 2024 21:43 IST

१० तोळे सोने चोरीला; सहा कार्यकर्त्यांनी घेतली पोलिसांत धाव

सातारा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्‍यानंतर सातार्‍यात उदयनराजे भोसले यांची मंगळवारी विजयी मिरवणूक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सहा सोन्याच्या चेन हिसकावून नेल्या. सुमारे दहा तोळे सोने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनराजे भाेसले विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. देगाव फाट्यापासून पोवई नाक्यापर्यंत कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र जमून पोवई नाक्यावर विजयी रॅली काढली. या रॅलीमध्ये अमर संजय जाधव (वय २७, रा. कोडोली, ता.सातारा) हे सहभागी झाले होते. विजयी रॅलीचे मोबाइलमध्ये ते रेकाॅर्डिंग करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्‍यांच्‍या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची तब्बल ३ तोळे वजनाची सोन्‍याची चेन चोरून नेली.

दरम्यान, अशाच प्रकारे आणखी पाच जणांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेल्याचे समोर आले असून, एकूण १० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. सातारा शहर पोलिस ठाण्यात सध्या एकच तक्रार दाखल झाली असून, उर्वरित पाच जणांची तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होती.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले