शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्याचे संकेत!, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू

By सचिन काकडे | Updated: May 8, 2025 15:32 IST

शरद पवार आज साताऱ्यात

सचिन काकडेसातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने आता जिल्ह्यातील सर्वच पालिकांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे; परंतु सर्वाधिक चुरशीचा सामना सातारा पालिकेत रंगणार आहे. दोन राजे एकत्र आल्याने साहजिकच त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे; परंतु राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्यासाठी यंदा पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहेत.सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता होती. २०१६ रोजी झालेल्या निवडणुकीत हे मनोमिलन तुटले अन् दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला शह देत नगराध्यक्ष पदासह एकूण २२ नगरसेवक निवडून आणत पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. पुढील सहा-सात वर्षांच्या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. दोन्ही राजे राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झाले. अंतर्गत हेवेदावे, द्वंद्व विसरून त्यांचे मनोमिलन घडून आले अन् दुभंगलेले कार्यकर्तेही एक झाले.

सातारा पालिकेत सध्या दोन्ही आघाड्या कार्यरत असल्या, तरी यंदाची निवडणूक आघाड्यांमार्फत लढायची की पक्षचिन्हावर? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तरीदेखील राजे व त्यांच्या शिलेदारांकडून निवडणुकीची जोरकस तयारी केली जाणार आहे. सातारा शहरात दोन्ही राजेंना मानणारा वर्ग मोठा आहे. तीन वर्षे निवडणूक झाली नसली तरी या कालावधीत त्यांनी पक्षबांधणी सक्षमपणे केली. नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धवसेना हे पक्ष थोडे बॅकफूटवर गेले. परंतु, महाआघाडीने यंदा सक्षमपणे निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने सातारा पालिकेतील राजकीय समीकरणे भलतीच ढवळून निघणार आहेत.

कशी असणार व्यूव्हरचना?सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी पक्षात दुफळी पडली असली, तरीदेखील शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही येथे आहे. उद्धवसेना व काँग्रेसनेदेखील पक्षाला अधिक बळकटी दिली नसली तरी आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. त्यामुळे राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा देण्यासाठी महाआघाडी नेमकी काय व्यूहरचना आखणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शरद पवार आज साताऱ्यातकर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त गुरुवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबते होऊ शकतात.

आम्हाला नवीन पर्याय हवा आहे, अशी सातारकरांची मागणी आहे. त्यामुळे सातारा पालिकेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धवसेना या तीन पक्षांचे पॅनल निश्चितच असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत पूर्वीही चर्चा झाली असून, आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. - दीपक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक 2024Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSharad Pawarशरद पवार