शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणाचा ‘जीवा-शिवा’च्या जोडीला फटका !, बैलांच्या संख्येत घट

By नितीन काळेल | Updated: July 9, 2025 14:23 IST

छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !

नितीन काळेलसातारा : गावांचेही शहरीकरण आणि शेतात यांत्रिकीकरणाला सुरूवात झाल्याने बळीराजाच्या ‘जीवा-शिवा’ची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील २० व्या पशुगणेत जिल्ह्यात सुमारे ४० हजारांवर बैल नोंद झाले होते. पण, आताच्या २१ व्या गणनेत २४ हजारांवर नोंद झाल्याचे समोर येत आहे. यामुळे बळीराजाही बैलांपासून दूर जात असल्याचे स्पष्ट होत आहे.शेती कसण्यासाठी पूर्वांपार बैलाचा वापर करण्यात येत असे. २५ वर्षांपूर्वीपर्यंततरी अधिक करुन बैल हेच शेतीच्या कामासाठीचे मुख्य साधन होते. पण, जागतिकीकरणाच्या लाटेत सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. गावांत सर्व सुख, सुविधा, यंत्रे पोहोचलीत. त्यामुळे गावेही कात टाकत असून शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतीतही क्रांतिकारक बदल होत आहेत. शेतकरी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेती कसण्यासाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. तसेच शेतकरी यंत्रे खरेदी करुन वापर करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.सातारा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी २० वी पशुगणना झाली. त्यावेळी ४० हजार ६६९ बैलांची नोंद झालेली. पण, नुकत्याच झालेल्या २१ व्या पशुगणनेत जिल्ह्यात फक्त २४ हजार २१७ बैलांची नोंद आहे. म्हणजे काही वर्षांतच बैलांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. आताच्या पशुगणनेची आकडेवारी अजून जाहीर नसलीतरी नोंदीचा आकडा समोर आलेला आहे.

छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !शेतीसाठी छोटी यंत्रे आली आहेत. ट्रॅक्टरही छोटा मिळत आहे. यामुळे शेतकरी ही यंत्रे सहजच खरेदी करतो. तर दुसरीकडे बैलांचा वर्षभर सांभाळ करायचा. त्यांना खाऊ घालायचे. त्यासाठी चारा आणि मनुष्यबळ लागते. त्यापेक्षा यंत्रे फायद्याची हे गणित ओळखून शेतकऱ्यांचा बैलाकडे ओढा कमी झाल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील पशुधन ११ लाखांवर..जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार १२ लाख ८ हजार ८७५ पशुधनाची नोंद झाली होती. तर आताच्या २१ व्या गणनेत ११ लाख १३ हजार ६०४ जनावरांची नोंद झालेली आहे. केंद्र शासन अधिकृतरित्या ही आकडेवारी जाहीर करणार आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनात ७ ते ८ टक्के घट झाली आहे. तसेच गायवर्गीय पशुधनाची संख्या वाढली आहे. म्हैसवर्गीय जनावरांची संख्या कमी झाली आहे. गायवर्गीय ३ लाख ५६ हजार ४८३ तर म्हैसवर्गीय संख्या २ लाख ५२ हजार १३० आहे.