शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

कृत्रिम पावसाचा ‘हुकमी एक्का’ फेकला!

By admin | Updated: September 8, 2015 21:29 IST

तेलही गेलं; तूपही गेलं : पश्चिम घाटावरून भिरभिरलंच नाही विमान; ‘पाण्याच्या बँका’ दुर्लक्षिल्याने दुष्काळ आणखी गडद--लोकमत विशेष

राजीव मुळ्ये --सातारा --दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा सुरू असताना, परिस्थिती हातातून निसटण्यापूर्वी झालेल्या एका महत्त्वाच्या चुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यशस्वितेची खात्री अधिक असलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला असता, तर ‘पाण्याच्या बँका’ मानल्या गेलेल्या पश्चिम घाटातल्या अनेक धरणांची पातळी वाढविता आली असती, असे जाणकारांचे मत आहे. हा हुकमी एक्का फेकल्यामुळे ‘तेलही गेलं; तूपही गेलं’ अशी स्थिती झाली आहे.  कृत्रिम पावसासाठी यावर्षी औरंगाबाद परिसराची निवड करण्यात आली. या प्रयोगाची यशस्विता ३० ते ३५ टक्के असल्याचे सांगितले जाते. तथापि, ढगांचा प्रकार आणि अन्य पूरक घटकांचा विचार करता पश्चिम घाटाच्या परिसरात हा प्रयोग अधिक यशस्वी झाला असता आणि ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हटल्या ्रगेलेल्या कोयना धरणासह अनेक धरणांची पाणीपातळी वाढू शकली असती, असे जाणकारांचे मत आहे. अर्थात, त्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची, तसेच स्थानिक पातळीवर अधिकाधिक ‘डाटा’ संकलित करण्याची गरज ते व्यक्त करतात.महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र आहे. मांढरदेव येथेही रडार आहे. बारामती येथे काही वर्षांपूर्वी ‘डॉपलर रडार’ उभारण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा बारामती हाच केंद्रबिंदू होता; मात्र कऱ्हाडपर्यंत जोरदार पावसाच्या सरी आल्या होत्या. त्या प्रयोगाची यशस्विता यंदापेक्षा अधिक होती. स्थानिक रडारवरून जमा केलेला ‘डाटा’ केंद्रीय संशोधन संस्थांकडे पाठविला जातो. तेथे त्याचे राष्ट्रीय स्तरावर पृथ:करण केले जाते. परंतु संकलित माहितीचा उपयोग मुख्यत्वे संशोधनकार्यासाठीच होतो. याउलट, निसर्ग अधिकाधिक लहरी होत असताना स्थानिक माहितीवर आधारित निर्णयप्रक्रिया राबविणे अधिक गरजेचे ठरते. पश्चिम घाटातील जिल्ह्यांमध्ये धरणांची संख्या लक्षणीय आहे. या भागात आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. पहाटे पडणाऱ्या दवाच्या प्रमाणावरून हे लक्षात येते. बाष्प, वायू आणि धूलिकण हे पावसासाठी अत्यावश्यक घटक असतात. धूलिकणांभोवती बाष्प गोळा होते आणि पर्जन्यचक्र गतिमान होते. धूलिकण आणि आर्द्रता हे बदलते घटक असून, वायूंचे प्रमाण वातावरणात स्थिर असते. बदलत्या घटकांचा विचार करून कृत्रिम पावसाचा प्रयोग किमान यापुढे तरी करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. यावर्षी पश्चिम घाटाच्या पट्ट्यातसुद्धा १५-१६ आॅगस्टपर्यंतच मॉन्सूनची प्रगती सुरू होती. नेहमी ती सप्टेंबरपर्यंत सुरू असते. जुलैचा उत्तरार्ध आणि आॅगस्टच्या मध्यापर्यंत या परिसरावर सातत्याने काळे ढग होते; मात्र पाऊस पडत नव्हता. या काळात वातावरणाची स्थिती बऱ्याच अंशी स्थिर असते. बदल फार संथपणे घडतात. ढग विरळ होण्याची प्रक्रियाही प्रदीर्घ असते. सिल्व्हर नायट्राइटची फवारणी या ढगांवर झाली असती, तर जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकली असती.मोठ्या धरणांबरोबरच दोन-तीन टीएमसी क्षमतेची छोटी धरणेही या भागात असून, आजमितीस ती कोरडी आहेत. या ‘बँकां’मध्ये थोडी ‘शिल्लक’ पडली असती, तर दुष्काळाची तीव्रता कमी होऊ शकली असती. वीजनिर्मितीसाठी कोयनेत आणखी थोडा साठा होऊन भारनियमनाचे संभाव्य संकट सौम्य करता आले असते, असे मत व्यक्त होत आहे. ढग आले अन् गेले...प्रतिरोध, आवर्त आणि आरोह या तीन प्रक्रियांमधून पावसाची निर्मिती होते. आपल्याकडील पावसाचे प्रमाण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आवर्त प्रक्रियेवर मुख्यत्वे अवलंबून आहे. पावसाचे ढग सहा ते बारा किलोमीटर उंचीपर्यंत असतात. पाणी आणि धूलिकणांच्या योग्य प्रमाणामुळे बाष्पघनता वाढून ते काळे दिसतात. जितके गडद काळे ढग, तितकी पावसाची शक्यता अधिक असते. या आर्द्रतेला द्रवरूप देण्यासाठी थंडाव्याची गरज असते आणि सिल्व्हर नायट्राइटमुळे ते शक्य होते. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जुलै-आॅगस्टमध्ये अशा पावसास अनुकूल ढगांची गर्दी होती; मात्र पाऊस पडलाच नाही.स्थानिक पातळीवरील ‘डाटा’ संकलित करून तो राष्ट्रीय संस्थांकडे पाठविला जातो. त्याचा उपयोग केवळ संशोधकांनाच होतो. ही परिस्थिती बदलून स्थानिक पातळीवर माहितीचा अधिकाधिक उपयोग होईल, अशी रचना करायला हवी. शालेय विद्यार्थ्यांनाही माहिती संकलनाचे ज्ञान द्यायला हवे. या माहितीचा उपयोग निर्णयप्रक्रियेत व्हायला हवा.- श्रीनिवास औंधकर, वातावरणातील बदलांचे अभ्यासकनिसर्गविषयक माहितीच्या संकलनातील तंत्रज्ञान आधुनिक झाले आहे. किमान १५० घटकांचा अभ्यास केला जातो; मात्र साधनांइतकेच महत्त्व ध्येय साध्य करण्याला दिले पाहिजे. म्हणूनच साधनांच्या बरोबरीने मानवी संशोधन आणि सल्ले महत्त्वपूर्ण मानायला हवेत. स्थानिक परिस्थिती आणि ‘पाण्याच्या बँका’ असलेली धरणे यापुढे तरी दुर्लक्षित होऊ नयेत.- एम. के. गरुड, भूगोलतज्ज्ञ