शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:10 IST

परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जासाताऱ्याचा पास न मिळाल्याने सांगली, कोल्हापूरच्या ई-पासवर दाखल

अक्षय सोनटक्केपरळी : परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. तरीही पुणे, मुंबई या बाधित भागातून गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. गणेशोत्सवात गर्दी वाढल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच येणाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी दहा दिवस की चौदा दिवस, याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.गणेशोत्सवासाठी गावाला येण्याचा चाकरमान्यांचा निर्धार कायम आहे. काही ई-पास घेऊन दाखलही झाले आहेत. चौदा दिवसांचे विलगीकरण गृहीत धरून त्यानंतर गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेण्याच्यादृष्टीने जुलैपासूनच काही मुंबई-पुणेकर भागात दाखल झाले आहेत. बाकीचे ई-पासची प्रतीक्षा करीत आहेत. काहींच्या ई-पासला विलंब होऊ लागल्याने त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांना चौदा दिवसांचे संस्थात्मक तसेच घरी विलगीकरण करण्यात येईल, तर लक्षणे नसणाऱ्यांचे थेट घरी चौदा दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे. तरीही नक्की किती दिवसांचे होम क्वारंटाईन होणार याचा मेळ लागत नाही.

या सगळ्या गदारोळात चाकरमानी गावातही दाखल होऊ लागल्याने ग्रामस्थांची भीती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढणार, या भयाने काही गावांनी चाकमान्यांनी चौदा दिवस विलगीकरणाचा नियम पाळलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. चाकरमान्यांना ई पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. वेळेत पास मिळत नसल्याने त्यांच्याही मनात धाकधूक आहे.ई-पासचा होतोय विलंबकोरोनामुळे जिल्ह्यात दाखल होण्यासाठी ई-पासची सोय केली आहे. परंतु साताऱ्यातील इ-पास मिळण्यासाठी विलंब होत आहे. तर काहीवेळेला मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना ई-पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. काहीवेळेला सातारा पास मिळत नसल्याने सांगली, कोल्हापूर नावाने पास जनरेट करुन सातारा जिल्ह्यात दाखल होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी