शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

सैन्य दलाच्या तळापासून बनले ‘तळिये’

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

१७ व्या शतकापासून इतिहास : तळहिरा ओढ्याच्या काठी वसले गाव

संजय कदम - वाठार स्टेशन -१७ व्या शतकात कोरेगाव तालुक्यातील देऊर गाव हे नागपूरकर भोसले महाराजांचे संस्थान होते. या काळात या राज्याचे संपूर्ण सैन्य देऊर नजीकच्या तळहिरा ओढ्याकाठी असलेल्या ‘चांदणमाळ’ या ठिकाणी तळ ठोकून होते. हाच तळाचा परिसर आज ‘तळिये’ या नावाने ओळखला जात आहे. गावालाही तेच नाव पडले आहे. कोरेगाव तालुक्यातील तळिये गावाशी चव्हाण या आडनावाचे मोठे नाते आहे. पूर्वीचे चौहान व आजचे चव्हाण हे मूळ अजमेर, कोटा व बुंदी (राजस्थान) या ठिकाणचे. मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव चव्हाण यांनी मोठी कर्तबगारी दाखवली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा विठोजी चव्हाण यांनी ही राजाराम महाराजांच्या काळात पराक्रम दाखवला. याचा मोबदला म्हणून विठोजी चव्हाण यांना ‘हिंमत ए बहादूर’ हा किताब देऊन शिरोळ, आटपाडी व कवठेमहांकाळ व सांगोला या ठिकाणी जहागिरी मिळाली होती. आटपाडी येथील तीन भाऊ हे नेर (खटाव), दुसरा तळिये (कोरेगाव) व तिसरा चव्हाणवाडी (फलटण) या ठिकाणी स्थायिक झाले. तळिये गावात आजही चव्हाणांच्या मूळ व्यक्तीची गावातील ग्रामदैवत भैरवनाथ व विठ्ठल मंदिरासमोर समाधी आहे, असा इतिहास असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात.तळिये गावाच्या उत्तरेस सर्मथ वाग्देव महाराजांचे समाधिस्थळ आहे. वाग्देव महाराज हे खंडोबा देवाचे भक्त असल्याने ते नियमित जेजुरीची पायी वारी करत. या काळातच त्यांनी तळिये गावतील भिकू गोपाळ चव्हाण यांच्या शेतात खंडोबाच्या पादुका स्थापन केल्या असल्याचे गावकरी सांगतात. या शेजारीच नाथ पंथीय कानिफनाथांचे मंदिर आहे. तळिये हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाची रचना गोलाकार आहे. गावच्या चारही बाजूंने जाण्या-येण्यासाठी प्रशस्त रस्ते व गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकरी सांप्रदायिक म्हणून या गावाची या भागात वेगळी ओळख आहे.१९३६ मध्ये या गावाने ग्रामसुधारणा अभियानात सहभाग घेतला होता. गावातील रस्ते, गटारव्यवस्था पाहून या गावचा गौरव ब्रिटिशांनी केला होता. परंतु याच दरम्यान गावाशेजारील तळहिरा ओढ्यात पूर्व बाजूस एक प्रेत जळत होते. याचा धूर यावेळी गाव पाहण्यासाठी आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यात गेल्याने तळिये गावाचा पहिला नंबर गेल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. याचा चुकीचा अर्थ काढीत ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची जागा प्रत्येकाच्या शेतातच करण्याचे ठरविले. त्यामुळे गेली ७५ वर्षे या गावास स्मशानभूमीची समस्या आहे. नव्याने हा प्रश्न आता सुटला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. ज्वारी पिकासाठी तळिये हे गाव प्रसिद्ध आहे. येथील ज्वारीस मोठी मागणी आहे. याशिवाय कांदा व बटाटा हे पीक या गावात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.१७ व्या शतकातील बंधारा आजही...गावाच्या अगदी जवळूनच तळहिरा ओढा गेला आहे. या ओढ्यावर १७ व्या शतकात नागपूरकर भोसले यांनी देऊर संस्थानासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी बंधारा बांधला होता. आजही हा बंधारा या ठिकाणी अस्तित्वात आहे. याच बंधाऱ्याखाली आता तळहिरा हा मोठा पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचा फायदा तळिये, देऊर व वाठारस्टेशन या गावांना होत आहे.