शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्रास्त्रासाठी सेना आग्रही : धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार असतील तर उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:05 IST

सातारा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढाईसाठी ‘नरेंद्रास्त्र’ आपल्याच भात्यात हवे, यासाठी

ठळक मुद्देसातारा लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवारीचा निर्णय होणार आहे.

सागर गुजर।सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढाईसाठी ‘नरेंद्रास्त्र’ आपल्याच भात्यात हवे, यासाठी शिवसेना आग्रही असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढलेले पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले आहे. त्यांच्या हातात शिवबंधन धागा बांधत असताना उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे त्यांना कोणताही शब्द दिला नसला तरी आगामी निवडणुकीत भगवा फडकावण्याचा शब्द मात्र जाधवांकडून घेतला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, असा आग्रह भाजपने शिवसेनेकडे धरला होता. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. भाजपने जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये प्रस्थापित राष्ट्रवादी व काँगे्रसला धक्के दिले आहेत. भाजपने या निवडणुकांमध्ये साडेतीन लाखांच्यावर मतदान घेतल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले; परंतु शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ सोडायला तयार नाही.

पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले असले तरी नरेंद्र पाटील हे त्यांच्यापेक्षा जोरदार टक्कर देऊ शकतात, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. नरेंद्र पाटील यांच्यासाठी भाजपने सातारा मतदारसंघ मागितला होता. शिवसेननेही नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील दाखवला. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सातारा लोकसभेची लढाई करावी, अशी अट घातली आहे. तशी चर्चाही दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाली आहे; पाटील यांच्यासह भाजपमधील आणखी दोघांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना इतर दोन मतदार संघात उमेदवारी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली होती. मात्र, त्याला शिवसेनेने नकार दर्शविला. केवळ साताऱ्याच्या जागेसाठी चर्चा करून निर्णय होऊ शकतो, इतर ठिकाणी नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. नरेंद्र पाटील यांना भाजपने मोठे पद दिले असल्याने त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा असूनही भाजप सोडता येत नाही. या परिस्थितीत पुरुषोत्तम जाधव यांचीच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याआधी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवारीचा निर्णय होणार आहे.भाजपची ताकद शिवसेनेच्या पथ्यावरभाजप-शिवसेनेची युती असल्याने युतीच्या धोरणानुसार भाजपला शिवसेना उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. भाजपने वाढविलेली ताकद शिवसेना उमेदवाराच्याच पथ्यावर पडणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण