शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्राच्या अवकाशात तरंगता ‘सातारी साखरपुडा’

By admin | Updated: December 27, 2015 00:09 IST

रोहन-मनालीचा अनोखा सोहळा : पॅरास्लायडिंगद्वारे दोघेही एकमेकांना अंगठी घालणार

सातारा : आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न किंवा साखरपुडा सोहळा साजरा करण्याची परंपरा तशी परदेशात रंगलेली. मात्र, साताऱ्याच्या दोन घराण्यांनी अरबी समुद्राच्या अवकाशात नियोजित वधू-वराचा साखरपुडा करण्याचा घाट घातलाय. साताऱ्याच्या दूरसंचार खात्यात काम करणाऱ्या श्रीपाद वाळिंबे यांची २४ वर्षीय मुलगी मनाली हिचा विवाह शेजारीच राहणाऱ्या रोहन दिलीप कुलकर्णी या २५ वर्षीय तरुणासोबत ठरला आहे. मंगळवारपेठेतील विश्वेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या या दोन्ही घराण्यांनी आपल्या मुलांचा साखरपुडा शनिवार, दि. २ जानेवारी रोजी निश्चित केला. हा सोहळा वेगळ्यापद्धतीने झाला पाहिजे, असा आग्रह मनालीने धरला. मनालीने जर्मन भाषेत उच्च पदवी घेतल्यानंतर जर्मनीच्याच एका नामवंत कंपनीत नोकरी धरली आहे. तर तिचा नियोजित वर रोहन हाही एका कंपनीत अभियंता म्हणून काम करीत आहे. मनालीचा आग्रह पाहून रोहननेही आगळा-वेगळा ‘इव्हेंट’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. कर्दे बीचजवळच मुरुड नावाचा परिसर असून, येथे अनेक वर्षांपासून समुद्रातल्या बोटींमधून ‘पॅरास्लायडिंग’ केले जाते; मात्र या माध्यमाचा अशाप्रकारे वापर होऊ शकतो, हे मात्र रोहन अन् मनाली प्रथमच जगाला दाखवून देणार आहेत. (प्रतिनिधी)