शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

वाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 16:36 IST

CoronaVirus wai Satara : वाई शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देवाईमध्ये गॅस शवदाहिनी उभारणीस मान्यता८२ लाख रुपये खर्चास मंजूरी  : मकरंद पाटील 

वाई : शहराच्या रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत द्रवरूप (एलपीजी) गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.मकरंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इंधन खर्चात बचत करणाऱ्या आणि वृक्ष व पर्यावरण यांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कामासाठी आमदार आमदार पाटील यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता.

वाई रोटरी क्लब व पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्थांनी या प्रकल्पासाठी सातत्याने आग्रह धरला होता. त्यानुसार नगरोत्थान योजनेतून शवदाहिनी उभारणीसाठी ६३ लाख, ८७ हजार रुपये तर शवदाहिनीकरिता निवारा शेड बांधकामासाठी १९ लाख, ११ हजार रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वार्षिक योजनेतून करावयाच्या या कामास प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली. त्यानुसार वाई शहरातील मुख्य स्मशानभूमीत एलपीजी गॅस शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. उभारणीनंतर वाई नगरपरिषदेने योजनेची देखभाल करावयाची आहे. असेही मान्यता आदेशात नमूद आहे. दरम्यान पालिकेने त्यासाठी निविदा मागविल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोटरी क्लबने शहरातील मुख्य स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याची संकल्पना पाच वर्षांपूर्वी मांडली होती. पालिकेच्या सहकार्याने व लोकसहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली होती. तसेच आमदार मकरंद पाटील याच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, खर्च वाढल्याने या प्रकल्पाचा नाद सोडला होता. परंतु दोन वर्षांपूर्वी आमदार पाटील यांनी स्वतः भेटून सदर प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला. त्यानुसार त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. पालिका प्रशासनाने व पदाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रकल्प उभा करावा, अशी मागणी वाई रोटरी क्लबचे डॉ. शरद अभ्यंकर यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwai-acवाईMakrand Patilमकरंद पाटीलSatara areaसातारा परिसर