शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

पालिकेच्या घाणेरड्या राजकारणाने आणखी एका अधिकाऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:21 IST

सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांना पुन्हा एकदा सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देपालिकेच्या घाणेरड्या राजकारणाने आणखी एका अधिकाऱ्याचा बळीरंजना गगे यांची बदली : अभिजित बापट पुन्हा पालिकेत

सातारा : सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांना पुन्हा एकदा सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.रंजना गगे यांनी दि. ७ जुलै रोजी पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सुत्रे आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरूवात केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या गुरुवार पेठ व लक्ष्मीटेकडी परिसरात रॅपिड अ‍ॅँटीजेन टेस्ट मोहीम राबविली. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही.

पालिकेच्या कारभाराला शिस्त लागत असतानाच रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजीत बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी पालिकेला प्राप्त झाले.गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू होती. यासाठी काही नगरसेवकांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात होते. या चर्चेला मंगळवारी पूर्णविराम मिळाला. मुख्याधिकारी गगे यांच्या बदलीमागे सत्ताधारी नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अभिजित बापट बुधवार दि. १२ रोजी पदभार स्वीकारणार आहेत.काम करण्याची दुसऱ्यांदा संधीअभिजित बापट यांनी २०१२ ते १६ या चार वर्षांच्या कालावधीत साताऱ्यात नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. यानंतर तीन वर्ष सातारा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सेवा केली आहे. सातारा विकास आघाडीच्या पसंतीचे मुख्याधिकारी साताऱ्यात आल्याने पालिका वतुर्ळात पुन्हा एकदा राजकीय वर्दळ सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिकाTransferबदली