शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात वीज कंपनीचा मेंटेनन्स, साताराकर घामाघूम : तापमान ३९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:05 IST

उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे. त्यामुळे वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात वीज कंपनीचा मेंटेनन्स, साताराकर घामाघूम तापमान ३९ अंशावर ग्रामीण भागात तर विजेअभावी शेतकऱ्यांवर संक्रात

सातारा : उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे. 

वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून जिल्ह्यातील पूर्व भागात तर ४० च्या आसपास आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.

वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास सर्वजण घरात थांबणे पसंद करतात. त्यावेळी पंखा, एसी, कुलरचा वापर करण्यात येत आहे. असे असतानाच वीज कंपनीकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे.साताऱ्यात तर मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून मेंटेशन्ससाठी वीज बंद करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. येथून पुढे गरज असेल त्यावेळी मंगळवारच्या दिवशी वीज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उनाबरोबच वीज नसल्याने त्रास सहन करावा लागणार आहे.दुसरीकडे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद पडले आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न पडला आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर विजेचे थकित बील असल्याने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, असे सांगण्यात आले. ऐन उन्हाळ्यातच वीज कंपनीचा असा कारभार सुरू असल्याने नागरिकांसह शेतकरीही हैराण झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान