शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘आपुलकी’च्या अंगणात बहरला ‘आनंद’

By admin | Updated: December 7, 2015 00:28 IST

गुड न्यूज

भुर्इंज : पाचवड (ता. वाई) येथील आपुलकी विशेष मुलांच्या शाळेचा माजी विद्यार्थी आनंद गुजर याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दहा हजार रुपये रोख, एस. टी. प्रवासाचा एका सहकाऱ्यासह मोफत पास, राज्यातील सर्व शासकीय विश्रामगृहात ‘विशेष अतिथी’ म्हणून राहण्याची मोफत सुविधा यासह विविध सोयी-सवलती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आनंद हा दोन्ही पायांनी व हाताने अपंग आहे. तरीदेखील आपुलकी शाळेत मिळालेल्या शिक्षण व मार्गदर्शनामुळे तो आज स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी सज्ज झाला आहे.मतिमंद मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या आपुलकी शाळेने नेहमीच विशेष मुलांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आनंद या माजी विद्यार्थ्याचे पुनर्वसन व्हावे, यासाठीही संस्थेच्या मुख्याध्यापिका सुषमा पवार या गेली अनेक वर्षे आनंदच्या संपर्कात होत्या. शासनाच्या पुरस्कारासाठी आनंदचा प्रस्तावही आपुलकी संस्थेतच तयार करुन पाठवला. आनंद हा विशेष मुलगा असला तरी मुळातच खूप हुशार आहे. दोन चाकांवरुन शाळेत जाताना आधी हिडीस-फिडीस करणारे नंतर त्याला वाट देऊ लागले, शाळेत पोहोचवू लागले. आनंदमध्ये आत्मविश्वास एवढा वाढला की, आता आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे हा ध्यास त्याने घेतला. या ध्यासातूनच जावली पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी, कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या माध्यामतून त्याला शासकीय अनुदानातून झेरॉक्स मशीन मंजूर झाले. या प्रकरणातही त्याला आपुलकी शाळेने मदत केली.शाळेच्या सर्वच उपक्रमात अग्रेसर असणारा आनंद विविध कलागुणांतही अग्रेसर आहे. त्यामुळेच शाळेने राज्य पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार केला आणि या माजी विद्यार्थ्यास तो पुरस्कार नुकताच जाहीर झाला. आपुलकी शाळेने आतापर्यंत अशा प्रकारे स्वत:च्या पायावर उभ्या केलेल्या विद्यार्र्थ्यांच्या संख्येने हॅट््ट्रिक केली आहे. या सर्व कामात समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कानडे यांचीही मोलाची मदत लाभली, अशी माहिती सुषमा पवार यांनी दिली. दरम्यान, आनंदला जे झेरॉक्स व्यवसायासाठी मेढा येथे तहसील कार्यालय आवारात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)त्यांनीच दिली वाटकुडाळहून पाचवड येथे शाळेत येत असताना बसस्थानकापासून शाळेपर्यंत आनंद दोन चाकांवर येत असे. सुरुवातीला त्याला अनेकांनी हिडीसफिडीस केले. पण शाळेतून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्याने भीती, लाज बाळगणे सोडून दिले. त्यामुळेच त्याच्यात आत्मविश्वास एवढा वाढला की नंतर तो संपूर्ण पाचवड परिसराचा लाडका झाला.