शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अमेरिकन वेबसाइटला ‘ठोसेघर’ची भुरळ

By admin | Updated: June 28, 2015 23:38 IST

संचालकांची भेट : व्यवस्थापनाबद्दल गौरव

परळी : ठोसेघर ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीला अमेरिकेतील ड्रोम अ‍ॅडव्हायझर या जगविख्यात वेबसाईटने उत्कृष्ट कामकाजाचे अ‍ॅवॉर्ड (प्रमाणपत्र) पोस्टाने पाठवुन दिल्यामुळे पुन्हा एकदा ठोसेघरचा धबधबा जगभरामध्ये परिचित झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.कास पठाराची जागतिक वारसा म्हणून जगाच्या नाकाशात नोंद झाल्यानंतर जगभरातील अनेक जगविख्यात वेबसाईटची भुरळ ठोसेघरवर पडली आहे. अमेरिकेतील ड्रोम अ‍ॅडव्हायझर या वेबसाईटच्या संचालकांनी २०१४ मध्ये पावसाळी हंगामात ठोसेघरला भेट देवून धबधबा तसेच पाठसराची पाहणी केली होती. ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितिच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सोय-सुविधांचाही सखोल अभ्यास केला होता. धबधब्याकडे जाण्यास बांधण्यात आलेली रेली, प्रेक्षा गॅलरी, पेव्हर ब्लॉकचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्यासाठी सिमेंटची बाके, या सर्व गोष्टींची संचालकांनी दखल घेतली होती. त्यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.धबधबा परिसराचे व्यवस्थापन कसे केले जाते याची इतिवृत्तंत माहिती घेतली होती.एक वर्षापूर्वी मुंबई येथील एका संस्थेने ठोसेघर धबधब्यावर झुलता पुल होण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी करुन येणाचा खर्चही तयार केला होता. हे अराखडा वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. यावर लोक प्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रयत्न सुरू केले असून बहुदा पुढीलवर्षी पर्यटकांना झुलत्या पुलाचा आनंद अनुभवयाला येणार आहे. (वार्ताहर)दुर्मिळ फुलांमुळे कास पठाराची ओळख अत्यंत कमी वेळात जगात झाली होती. कासनंतर ठोसेघर धबधब्याची आणि तेथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाची दखल ड्रोम अ‍ॅडव्हायझरसारख्या वेबसाईटने ही बाब निश्चितच जिल्ह्यासाठी भुषणावह आहे.- जयराम चव्हाण, सरपंच ठोसेघर