शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्याचे पुष्पप्रेम उलगडले कास पठारावर!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

आठ वर्षे अभ्यास : श्रीरंग शिंदे यांच्या पुस्तकाचे वनसचिवांच्या हस्ते प्रकाशन; जैवविविधतेची माहिती

पेट्री : कास पठारावरील पुष्पवैभवावर सचित्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मोह अनेक निसर्गप्रेमींना होतो; परंतु वन कर्मचाऱ्यानेच असे पुस्तक लिहिण्याची घटना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते कास पठारावरच रविवारी त्यांचे प्रकाशन करण्यात आले. अनेक वनस्पतितज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. परंतु कास पठाराचे व्यवस्थापन करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीरंग शिंदे हे बामणोली विभागाचे वनपाल म्हणून कार्यरत असून, पठारावरील वनस्पतींची, त्यांच्या गुणधर्मांची, फुलण्याच्या दिवसांची त्यांना माहिती आहे. कास पठारावर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी दहा गाइड तयार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या मोठ्या पुस्तकात शंभर वनस्पतींची माहिती असून, पन्नास वनस्पतींची माहिती असणारी छोटी आवृत्तीही रविवारी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने पठारावरच प्रकाशित करण्यात आली.राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते झालेल्या या अनौपचारिक प्रकाशन समारंभास कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. के. राव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह दीपक खाडे, तानाजी गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनसचिव खारगे यांनी कर्मचारी आणि पर्यटकांशी संवाद साधला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक असून, कास पठारावरील जैवविविधतेची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहिली आहे. पर्यटकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.कास पठारावर कचरा दिसत नसल्याने वनसचिवांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कासाणी-आटाळी गावांदरम्यान वाहनांच्या पार्किंगची उत्तम सोय झाली तर पठारावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे खारगे यांनी सांगितले. शिंदे यांचे पुस्तक माहितीसाठी सर्व वनपाल, वनरक्षकांना पोहोच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनौपचारिक कार्यक्रमास पर्यटकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)तीन दिवसांत १३ हजार पर्यटकशुक्रवार ते रविवार जोडून सुट्या आल्याने पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. या तीन दिवसांत सुमारे १३ हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर्षी एकंदर एक लाखांहून अधिक पर्यटक पठारावर आले असून, शुल्कवसुली २० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २०११ पासूनची ही सर्वाधिक शुल्कवसुली आहे.