शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

आरोप-प्रत्यारोपांनी जावळीतील वातावरण तापले

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

जावळी बँक निवडणूक : संस्थापक सहकार पॅनेलचे विरोधकांसमोर कडवे आव्हान

कुडाळ : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची भि. दा. भिलारे गटाकडेच आत्तापर्यंत सत्ता राहिली आहे. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत कळंबे महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या व बँकेच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या मंडळींना घेऊन विद्यमान अध्यक्ष योगेश गोळे यांनी संस्थापक सहकार पॅनेलच्या माध्यमातून भिलारे गटासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या आव्हानाला तोंड देता येत नसल्यामुळेच भिलारे गटाकडून वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात असल्यामुळे जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.सुरुवातीला बँक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू असतानाच भिलारे गटातील काही इच्छुकांनी नेत्यांच्या आदेशापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शेवटपर्यंत बिनविरोधची चर्चा असफल टळली. तर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापूर्वीच भिलारे गटाने जनजागृती मेळाव्यांद्वारे प्रचारदेखील सुरू करीत विद्यमान अध्यक्षांवर आरोप करायला सुरुवात केल्याने बँक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले. परंतु गोळेंनी अर्ज माघारीपर्यंत आपण कोणतीही दिशा ठरवणार नाही, असे म्हणत संयम बाळगला.करहर, मेढा मेळाव्यात भिलारे गटाकडून गोळे गटावर आरोप-प्रत्यारोप करीत घेरण्याचे काम करण्यात आले. अगदी वैयक्तिक टीका करून भिलारे गटातील नेत्यांनी मेळावे गाजवले. तर मेळाव्यांच्या व्यासपीठावर नेते, पदाधिकारी आणून आपली राजकीय शक्ती दाखवण्याचाच प्रयत्न केला. त्यांच्या प्रत्येक आरोपाला मेढा सभेत विद्यमान अध्यक्षांनी सुसंस्कृतपणे उत्तरे देत वैयक्तिक टीका टाळत केवळ बँकेच्या कामकाजाविषयी, प्रगतीविषयीच आपण बोलणार असल्याचे सांगत आपला राजकीय मुत्सुद्दीपणा दाखवला. दोन वर्षांत सर्वांना बरोबर घेऊन पाचशे कोटींवरून नऊशे कोटींच्या ठेवी गोळा करून बँकेचे भागभांडवल कसे वाढवले, तर यापुढे बँकेच्या कामकाजात काय सुधारणा करता येईल, ही संस्था नावारूपाला आणता येईल याचीच कल्पना त्यांनी सभासदांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)समतोल न राखल्याने भिलारे गटासमोर अडचणीबँकेत खरी दुरंगी लढत होणार आहे. संस्थापक सहकार पॅनेलचे नेतृत्त्व अर्थ-शिक्षण समिती सभापती अमित कदम करीत आहेत. तर विरोधी भिलारे गटाच्या पॅनेलचे नेतृत्त्व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे करीत आहेत. मात्र, त्यांच्या गटाकडून कोयना विभागात कोणाला संधी मिळाली नाही. तर अमित कदम व योगेश गोळे यांनी समतोल राखत कोयना विभागाला संधी देण्याबरोबरच लक्ष्मण धनावडे, अविनाश कारंजकर, यशवंतराव देशमुख, अरुण सुर्वे, सेवानिवृत्त व्यवस्थापक सूर्याजी विधाते, सी. वाय. पवार, ऋतुजा मांढरे या दिग्गजांना संधी देऊन भिलारे गटासमोर आव्हान उभे केले आहे.