शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सर्व तिकिटेच माझ्याकडे; काळजी नाही करत..! : उदयनराजेंची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:49 IST

‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय

ठळक मुद्देराजकीय वर्तुळाचे लक्ष घेतले वेधून

सातारा : ‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना खासदार उदयनराजे यांनी वृत्त वाहिनींशी बोलताना हे वक्तव्य केले.मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी या बैठकीला होते.

या बैठकीत राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सातारा मतदारसंघाचाही विषय चर्चेत आला. या चर्चेदरम्यान, सातारा जिल्ह्यातील पक्ष आमदारांचा विरोध उदयनराजेंच्या उमेदवारीला असल्याचा मुद्दा समोर आला. त्यानंतर प्रमुख नेत्यांनी साताऱ्यातील पक्ष आमदारांना विचारात घेऊनच उदयनराजेंना उमेदवारी देण्यात यावी, असे ठरविले. मुंबई बैठकीतील ही वार्ता जिल्ह्यात सर्वत्र पसरली.त्यामुळे उदयनराजेंना तिसºयांदा पक्ष साताºयातून उमेदवारी देणार का ? अशीही चर्चा झडू लागली. त्यानंतर उदयनराजे यांनी ‘बसचं, पिक्चरचं, पोस्टांच तिकीट माझ्याकडं आहे. त्यामुळे मी तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी एकप्रकारे गुगली टाकून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर साताºयातून राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंनाच मिळेल, हे जवळपास निश्चित आहे; पण उदयनराजेही सतत भाजप, शिवसेनेतील पदाधिकारी, मंत्र्यांच्या भेटी घेताना दिसतात. दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साताºयात आल्यावर त्यांच्याबरोबर दिसतात. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा अंदाज भल्याभल्यांना आणखी आला नाही. आताही त्यांनी ही गुगली टाकून वेगळाच राजकीय डाव टाकला, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा अंदाज वर्तविणे कोणालाही कधीच शक्य नसते, हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे. यावर सोशल मीडियावरही चर्चा रंगायला लागली आहे.जगात शांतता नांदावी...पुलवामातील शहीद जवानांना खासदार उदयनराजे यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘खºया अर्थाने जातपात नसती तर जग सुखी झाले असते. पूर्वी आणि आताच्या लोकांत खूप फरक आहे. पूर्वीच्या लोकांच्या समोर समाजाचे हित होते. कोणताही धर्म हिंसाचार करा म्हणून सांगत नाही. जगात शांतता राहावी, यासाठी सर्वांनीच मनन आणि चिंतन करावे. कारण, एकदा ठिणगी पडली तर उत्तरला प्रत्युत्तर असते. म्हणूनच जगात शांतता नांदावी, हीच इच्छा आहे.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले