शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखाद्य बर्फाला मिळाला निळा रंग! ग्राहकांची काळजी : १ जूनपासून अंमलबजावणी; अन्न औषध प्रशासन कारवाईसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:53 IST

सातारा : ग्राहकांना अन्न पदार्थ विक्री करताना त्यासाठी वापरण्यात आलेला बर्फ औद्योगिक वापराचा असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : ग्राहकांना अन्न पदार्थ विक्री करताना त्यासाठी वापरण्यात आलेला बर्फ औद्योगिक वापराचा असल्याचे निदर्शनास आले आहे. असा हा अखाद्य बर्फ खाणं ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अखाद्य बर्फाचा रंग निळा करण्याच्या सूचना केल्या आहेत. याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे.

राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये व अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा व मानके कायद्यात नमूद केलेला व खाद्योपयोगासाठी वापरण्यात येणारा रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगांची छटा निर्माण होईल, असे वापरण्याचे निर्देश आहेत. निर्देशानुसार किमान १० पीपीएक खाद्यरंग टाकणे आवश्यक आहे. खाद्य पदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा, वितरण, वाहतूक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन नियमानुसार कारवाई होईल. उत्पादकांनी खाद्यरंगाचा वापर केला नाही तर खाद्यबर्फ समजून त्याला अधिनियमाच्या कार्यकक्षेत समजला जाईल, असेही अध्यादेशात नमूद केले आहे.बर्फाच्या लादीत आढळला  चक्क कोळी ..सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात लिंबू सरबत आणि गोळ्याच्या गाड्यावर व्यावसायिक अजित काळे यांना बर्फाच्या लादीत आत अडकलेला कोळी दिसला. त्यांनी तातडीने याचे छायाचित्र ‘लोकमत’ला पाठविले. याविषयी त्यांनी संबंधित व्यावसायिकाला विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ‘ऐसा तो चलता है’ म्हणत वेळ मारून नेली. पण अनेकदा बर्फात असे काही आढळले तर तेवढा तुकडा बर्फ आधी वापरून संपविण्याचा फंडा व्यावसायिक वापरतात, असे या व्यापाऱ्याने गप्पांच्या ओघात सांगिंतले.बर्फाला रंग कशासाठी?पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करण्यात आलेला बर्फ, खाद्य बर्फ हा अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ‘अन्न’या परिभाषेत मोडतो. खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ हा सर्वसामान्यापणे पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेला नसल्याने त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. यावर तोडगा काढण्यासाठी अखाद्य बर्फ अधोरेखित करण्यासाठी त्याला निळा रंग करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय